तो पुन्हा येतोय,या 5 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस,हवामान विभागाचा अंदाज काय सांगतोय?

Spread the love

Maharashtra Rain
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून तयार झालेले ढगाळ वातावरण हळूहळू निवळत आहे.तसेच थंडीचा कडाका वाढत चालला आहे.कुठे कुठे तर तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली गेला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मीचौंग चक्रीवादळ तयार झाले होते.या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यांना चांगलाच फटका बसला.त्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

याचाच परिणाम म्हणून राज्यात देखील डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.आता हे चक्रीवादळ पूर्णपणे निवळले असून त्याचा परिणाम म्हणून आता राज्यातील गारठा वाढू लागला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली होती.आता ही स्थिती पूर्णपणे निवळली आहे.परंतु आता नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

याचाच परिणाम म्हणून राज्यात आज ढगाळ वातावरण राहणार आहे.तसेच काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे.मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.त्यात आता परत भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार आज १७ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा,सांगली,कोल्हापूर अशा ५ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment