Jwari Market:- अरे बापरे,ज्वारीला मिळतोय तब्बल ७१०० रुपये प्रतिक्विंटल भाव,९ हजारांच्या पार जाण्याची शक्यता,बाजरी आणि गहू पण खातोय चांगला भाव!

Spread the love

Jwari Market
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस,तसेच भुसार पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ या मुळे भुसार पिकाच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.ज्वारी सारख्या पिकाने यंदा सारेच रेकॉर्ड तोडले आहेत.ज्वारीला मार्केट मध्ये ७१०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्याचबरोबर गहू आणि बाजरीचे देखील भाव वाढले आहेत.

ज्वारीला ७१०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.परंतु ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारीला ७१०० रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे.

भुसार पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ

अलिकडील काळात वाढलेली महागाई त्यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना देखील वाढीव मजुरी द्यावी लागत आहे.भुसार पिकांची मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी भुसार पिकांना चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वळला आहे.नगदी पिकांमधून शेतकऱ्यांना रोख उत्पन्न मिळते.

शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्याकडे वाढलेला कल पाहता येत्या काळात भुसार पिकांची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे भुसार पिकांना चांगलाच भाव मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र भुसार धान्य खरेदीसाठी वाढीव मोबदला द्यावा लागणार आहे.

हे पण वाचा:- आता आनंदाचा शिधा योजनेच्या अंतर्गत ज्वारी,बाजरी किंवा नाचणीचा समावेश होणार!

ज्वारी गाठणार ९००० रुपयांचा टप्पा

भुसार मालाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ लक्षात घेता भुसार माल चांगलाच भाव खाणार आहेत. जाणकारांच्या मतानुसार येत्या काही दिवसांत ज्वारीचा भाव ९००० रुपये प्रति क्विंटलच्या पार जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी झाली असून काढणीसाठी वेळ असल्याने ज्वारी तो पर्यंत चांगलाच भाव खाणार असल्याचे दिसत आहे.

यामुळे थोडा दिलासा मिळेल

आताच राज्य सरकारने भुसार पिकांविषयी एक नवीन निर्णय जाहीर केला आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबांना सणासुदीला आनंदाचा शिधा वाटप करण्याची योजना सुरू केली आहे.या मध्ये आता नव्याने ज्वारी,बाजरी किंवा नाचणी यांचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे गरीब कुटुंबांना थोडासा का होईना पण दिलासा मिळणार आहे.

गहू आणि बाजरी देखील तेजीत

ज्वारीला बाजारात चांगला भाव मिळाल्याने काही ग्राहकांनी ज्वारी खरेदी कडे आपली पाठ फिरवली आहे.त्यांचा कल गहू आणि बाजरी खरेदीकडे वाढला आहे.त्यामुळे गव्हाला आणि बजारीला देखील मागणी वाढल्याने त्यांचे देखील भाव कडालले आहेत.बाजारात गव्हाला ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये तसेच बाजरी ३ हजार रुपयांच्या घरात विकली जात आहे.

बाजारपेठेत तुरीला ८५०० हजार,कापूस ७ हजार,सोयाबीन ४७०० ते ४८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळताना दिसत आहे.देशावर सध्या एलनिनो वादळाचा परिणाम असल्याने पुढील वर्षी देखील पाऊस कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे भविष्यात धान्याचे भाव आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment