कडबा कुट्टी मशीन साठी मिळणार १०० टक्के अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज! Kadba Kutti Machine Scheme

Spread the love

Kadba Kutti Machine Yojana 2024
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत.राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन (Kadba Kutti Machine) वाटप करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीनचे वाटप १०० टक्के अनुदानावर केले जाणार आहे.या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेबद्दल(Kadba Kutti Machine Free Distribution Scheme) सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.

Kadba Kutti Machine Scheme 2024

राज्यातील अनेक शेतकरी पशू पालन करतात.अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांना चारा व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.चारा व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना कडबा कुट्टी वरदानच ठरत आहे.अगदी कमी वेळेत मोठ्या चाऱ्याचे अगदी लहान लहान भागांमध्ये विभाजन केले जाते.

कडबा कुट्टी यंत्र योजना 2024 : जनावरांना चारा व्यवस्थापन करण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राद्वारे केले जात आहे.चारा जर मोठा असेल तर जनावरे तो चारा व्यवस्थित खात नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाऱ्याचे नुकसान होते.आणि हाच चारा कडबा कुट्टी यंत्राच्या सहाय्याने बारीक केल्यास तो वायाला जात नाही.त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे कडबा कुट्टी यंत्र असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:- दूध व्यवसाय करण्यासाठी मिळणार बिगरव्याजी कर्ज,पहा कुठे करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती!

परंतु प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने अनेक शेतकरी कडबा कुट्टी यंत्र खरेदी करू शकत नाहीत. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जात आहे.याचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी आवश्यक पात्रता
Kadba Kutti Machine Scheme Eligibility

•कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
•अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्रच्या ग्रामीण भागातील रहिवाशी असावी.
•अर्जदार व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
•अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
•अर्जदार व्यक्तीच्या नावे १० एकर पेक्षा कमी शेतजमीन असणे आवश्यक आहे.

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अर्जदार व्यक्तीकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

•सात बारा उतारा ७/१२
•आठ-अ उतारा ८/अ
•अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
•अर्जदार व्यक्तीचे पॅन कार्ड
•राष्ट्रियकृत बँक खाते पासबुक झेरॉक्स

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कुठे करायचा?
Kadba Kutti Machine Free Distribution Scheme Application Process

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्जदार व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.अर्ज करत असताना वर नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.त्यासाठी अर्जदार व्यक्तीला महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अशा प्रकारे आपण कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज करू शकणार आहेत. ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment