राज्यात पुन्हा कर्जमाफी,’या’ शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ,सरकारने जीआर काढून दिली माहिती! Karjmafi 2024

Spread the love

Karjmafi 2024: महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे.राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भातील माहिती राज्य सरकारच्या वतीने शासन निर्णय काढून देण्यात आली आहे.सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सदरचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.फेब्रुवारी महिन्यात 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी 52,562 लाख रुपये इतकी रक्कम वितरित केली होती.

परंतु बाधित झालेल्या राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता.त्यासाठी सहकार आयुक्त पुणे यांनी राज्य सरकारकडे 379.99 लाख रुपये निधी वितरित करावा असा प्रस्ताव सादर केला होता.त्या अनुषंगाने राज्य सरकारने सदर प्रस्तावाची 2023 च्या हिवाळी अधिवेशनात 379.99 लाख रुपये निधी पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केला होता.

जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने 379.99 लाख रुपये मंजूर केलेल्या निधीच्या 70 टक्के म्हणजेच 265.99 लाख रुपये निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय काढून मान्यता दिली आहे.

त्यामुळे राज्यातील शेतकरी ज्यांचे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या दरम्यानच्या काळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे असून ते अद्याप पर्यंत पीक कर्ज माफी पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळणार आहे.

पीक कर्ज माफीचा शासन निर्णय (जीआर) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment