खास या शेतकऱ्यांसाठी योजना,जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर मिळणार बिनव्याजी कर्ज!KCC Loan 2024

Spread the love

Kisan Credit Card Apply Online
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १.६० लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले जाते.केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कुठल्याही प्रकारची हमी द्यावी लागत नाही.

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लघु पीक कर्जाचे वाटप करण्यात येते.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १.६० लाख रुपयांच्या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा(Crop Insurance) देखील काढला जातो.त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात येते.

आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कसा मिळवायचा?किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कुठे करायचा?अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे? अर्ज करण्यासाठी कोण पात्र असेल?या बाबतची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हे लेख शेवट पर्यंत वाचवा लागणार आहे.

हे पण वाचा:- आता दूध व्यवसाय करण्यासाठी मिळणार बिगरव्याजी कर्ज,पहा कुठे करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती!

किसान क्रेडिट कार्ड 2023 Kisan Crdit Card

केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे.केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनाचा लाभ घेता येणार आहे.आता नव्याने सरकारने पशू पालक आणि मच्छीमारांचा देखील या योजनेत समावेश करून घेतला आहे.तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही देखील ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून लाभ घेऊ शकणार आहेत.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

•अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
•अर्जदार शेतकऱ्याचे पॅन कार्ड
•मोबाईल क्रमांक
•सात बारा उतारा
•आठ अ उतारा
•सात बारा उताऱ्यावर पिकांची नोंद
•पासपोर्ट आकाराचे फोटो
•इतर बँकिंग संस्थेकडून या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे

•ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे आणि शेतात कोणतेही पीक आहे असे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
•या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना १.६० लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाते.
•पशू पालक आणि मच्छीमार यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात आहे.
•या योजनेचा लाभ ३३ कमर्शिअल बँका,४८ ग्रामीण बँका आणि ३२१ सहकारी बँकांच्या माध्यमातून दिला जात आहे.
•शेतकऱ्यांना कर्जाची मर्यादा स्वतः ठरवता येते.
•शेतकऱ्यांनी KCC (Kisan Credit Card) खात्यातील रक्कम जेवढे दिवस वापरले आहे तेवढ्याच दिवसाचे व्याज(शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही) आकारले जाते.
•दरवर्षी कर्ज रकमेमध्ये १० टक्के वाढ केली जाते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक पात्रता

•अर्जदार व्यक्तीचे वय १८ ते ७५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
•ज्या अर्जदार व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना सह कर्जदार असणे बंधनकारक आहे.
•शेतकऱ्यांच्या शेतात पीक असणे आवश्यक आहे.
•अर्जदार शेतकरी कोणत्याही बँकेचा थकीत कर्जदार नसावा.
•अर्जदार व्यक्तीचे सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे.
•पशू पालक शेतकरी देखील पात्र असणार आहेत.
•मत्स्यव्यवसाय करणारे देखील पात्र आहेत.
•जे शेतकरी भाडे तत्वावर दुसऱ्या शेतकऱ्याची शेतजमीन करतात त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
•देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी देखील पात्र असणार आहेत.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजेच अल्प मुदत पीक कर्ज योजना आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँका,ग्रामीण बँका,सहकारी बँका,खाजगी बँका या ठिकाणी अर्ज करायचा आहे. बँकेतून अर्ज घेऊन त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.बँका अर्जाची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देतील. किसान क्रेडिट कार्डसाठी बँकेकडे अर्ज केल्यानंतर १४ दिवसांच्या आत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देणे बँकांना बंधनकारक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment