KCC:- आता किसान क्रेडिट कार्ड बनणार फक्त 14 दिवसांत,ही आहे शेवटची मुदत,Apply Now

Spread the love

KCC

KCC
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते.शेतकरी आर्थिक समृद्ध झाला पाहिजे हा या योजनांचा मुख्य उद्देश असतो.सरकार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज देखील उपलब्ध करून देतात.ज्यातून शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकतो.

शेतकऱ्यांना बँकेकडून कमी व्याजदरामध्ये पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असणे गरजेचे आहे.परंतु अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले किसान क्रेडिट कार्ड बनवून घेतले नाही अशा शेतकऱ्यांसाठी हे कार्ड बनविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.केंद्र सरकार KCC सॅच्युरेशन ड्राईव्ह या मोहिमेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवून देणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड ही एक प्रकारची पीक कर्ज योजना आहे.ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर वार्षिक चार टक्के दराने व्याज आकारले जाते.परंतु जे शेतकरी विहित मुदतीत आपल्या कर्जाची परतफेड करतात त्यांना या योजनेच्या माध्यमातून तीन टक्के अनुदान दिले जाते.

तसेच 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे तारण द्यावे लागत नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांचा तारण करण्यासाठीचा खर्च कमी होतो.

अर्ज कुठे करायचा?

ज्या शेतकऱ्यांना आपले किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवायचे आहे अशा शेतकऱ्यांनी आपले अर्ज आपल्या संबंधित बँकेत करावयाचे आहेत.शेतकऱ्यांनी बँकेला आवश्यक असलेली कागदपत्रे बरोबर आढळल्यास बँकेला 14 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड जारी करावे लागते.

हे पण वाचा:- पी एम किसानच्या नियमात बदल,२२.४० लाख शेतकऱ्यांचा पत्ता कट

कधीपर्यंत मुदत असेल?

केंद्र सरकार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी केसीसी सॅच्युरेशन ड्राईव्ह मोहीम सबंध देशभर राबवित आहे.या योजनेची सुरुवात या महिन्याच्या 1 तारखेपासून करण्यात आली आहे असून संपूर्ण महिनाभर ही योजना सुरू राहणार आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

तुम्हाला फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळेल

केंद्र सरकारने आतापर्यंत फक्त अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबविली होती. ज्यामधे तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत कर्जाच्या व्याजावर सवलत देण्यात आली होती.परंतु आता नव्याने दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन व्यवसायाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तीन लाखांऐवजी केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

ज्या शेतकऱ्यांना आपले किसान क्रेडिट कार्ड 14 दिवसांच्या आत बनवायचे असेल अशा शेतकऱ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर आपल्या संबंधित बँकेत करावयाचे आहेत.अर्ज करताना शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा ७/१२ उतारा आणि ८अ उतारा तसेच इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज करावयाचा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment