Kharip Pik Vima
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम पीक विमा मिळावा अशी सूचना विमा कंपन्यांना केली होती.त्यांच्या या मागणीला यश आल्याचे दिसून येत आहे.
विमा कंपन्यांकडून राज्यातील सहा जिल्ह्यांमधील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पोटी 613 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तसेच इतर जिल्ह्यांतील पीक विमाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.
Kharip Pik Vima
राज्यात खरीप हंगामामध्ये सरासरीच्या खूप कमी पाऊस झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम पीक विमा मिळावा ही मागणी जोर धरत होती.पुणे आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 26 हजार शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच धाराशिव,अकोला,परभणी,जालना,नागपूर आणि अमरावती या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.या सहा जिल्ह्यातील 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा उतरविला होता.
त्यांना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी 613 कोटी 19 लाख रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहे.याची येत्या दोन दिवसात सुरुवात केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
नाशिक,जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन,मका,बाजरी या पिकांसाठी पीक विमा(Kharip Pik Vima) उतरविला आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.पीक विमा कंपनीकडून या पिकांचे दावे मान्य करण्यात आले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये आक्षेप नाहीत
सांगली,कोल्हापूर,परभणी आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.तसेच या जिल्ह्यातील पीक विमा मिळण्यासाठी विमा कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप नोंदवले गेले नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मका आणि सोयाबीन या पिकांचे नुकसानीचे दावे पीक विमा कंपनीकडून अमान्य करण्यात आले आहेत.
हे पण वाचा:- राज्यातील या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर!
या जिल्ह्यांचा पीक विम्याचा तिढा कायम
•मराठवाड्यातील लातूर,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील पिकांचे नुकसानीचे दावे पीक विमा कंपनीकडून मान्य करण्यात आले आहेत.तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील देखील पिकांचे नुकसानीचे दावे मान्य करण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंतिम लाभार्थी याद्या तयार करून दोन ते तीन दिवसांत नुकसाभरपाईची रक्कम वितरित केली जाईल.Kharip Pik Vima
•परंतु मराठवाड्यातील बीड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील पिकांचे नुकसानीच्या दाव्यांवर पीक विमा कंपनीकडून कृषी विभागाकडे आक्षेप नोंदविला आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.