Kukkut Palan Yojana Maharashtra :- 1000 मांसल पक्षी कुक्कुट पालन करण्यासाठी मिळणार 75 टक्के अनुदान, अर्ज करण्यासाठी ही आहे अंतिम मुदत!

Spread the love

Kukkut Palan Yojana Maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विवध योजना राबविल्या जात असतात.त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जातात.शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे,तो आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा तसेच त्याचे सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात असतात.

काय आहे योजना?
Kukkut Palan Yojana Maharashtra

पशू संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मांसल पक्षी कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जात आहे.यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन पशू संवर्धन विभाग यांनी केले आहे.सदरची योजना राज्यातील मुंबई,मुंबई उपनगरे या जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार नाही.तसेच लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला व ३ टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

लाभार्थी निवडीचे निकष-प्राधान्यक्रम

१.अत्यल्प भूधारक शेतकरी(१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
२.अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
३.सुशिक्षित बेरोजगार(रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
४.महिला बचत गटातील लाभार्थी/वैयक्तिक महिला लाभार्थी
वरील प्रमाणे उतरत्या क्रमाने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

किती अनुदान मिळते?

Kukkut Palan Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशू संवर्धन विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या १००० मांसल पक्षी कुक्कुट पालन योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.उर्वरित २५ टक्के रक्कम लाभार्थ्यास स्वतः भरावी लागते.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते.उर्वरित ५० टक्के रक्कम लाभार्थ्यास भरावी लागते.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या अंतर्गत जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार अनुदान!

अनुदानाची किती रक्कम मिळते?

Kukkut Palan Yojana Maharashtra

१००० मांसल पक्षी कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पशू संवर्धन विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासकीय अनुदानापोटी १,६८,७५०/- रुपये रक्कम दिली जाते. स्वहिस्स्यापोटी लाभार्थ्याला ५६,२५०/- रुपये रक्कम भरावी लागते.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासकीय अनुदानापोटी १,१२,५००/- रुपये रक्कम अदा केली जाते. लाभार्थ्याला स्वहिस्स्यापोटी १,१२,५००/- रुपये रक्कम भरावी लागते.

आवश्यक कागदपत्रे Kukkut Palan Yojana Anudan

Kukkut Palan Yojana Maharashtra

१.फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२.सातबारा उतारा
३.८ अ उतारा
४.अपत्य दाखला/स्वघोषणा पत्र
५.आधार कार्ड
६.रहिवाशी प्रमाणपत्र
७.बँक खाते पासबुक
८.रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते.)
९.७/१२ उतारा नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र/अथवा जमीन भाडे करारनामा
१०.अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
११.दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
१२.दिव्यांग असल्यास दाखला
१३.बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४.वय-जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५.शैक्षणिक पात्रतेचा दाखला
१६.रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत
१७.प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अर्ज कुठे करायचा?Kukkut Palan Subsidy In Maharashtra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या १००० मांसल पक्षी कुक्कुट पालन व्यवसाय अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत ही १५ डिसेंबर २०२३ असणार आहे.त्यासाठी तुम्हाला पशू संवर्धन महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला अर्जदार नोंदणी करावी लागणार आहे त्याची सुद्धा लिंक आम्ही खाली देत आहेत.

आपण आपल्या मोबाईल वरून देखील पशू संवर्धन विभागाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ऑनलाईन फॉर्म भरून भरू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment