Kunbi Maratha Records :- 1 मिनिटांत काढता येणार कुणबी जात प्रमाणपत्र?कोणती कागदपत्रे लागणार?जाणून घ्या सविस्तर माहिती!

Spread the love

Kunbi Maratha Records
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलने केली जात आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मागणी लावून धरली आहे.त्यांनी आरक्षणासाठी वेळोवेळी आंदोलने आणि उपोषण देखील केले आहे.मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे.

यासाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आंदोलन करण्यात आले होते. याचाच पडसाद म्हणून राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक अध्यादेश काढण्यात आला आहे.त्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.ज्या व्यक्तीची कुणबी नोंद आढळली आहे त्या व्यक्तीच्या वंशावळीमधील इतर व्यक्तींना या आरक्षणाचा फायदा होणार आहे.

कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे?
Kunbi Maratha Records

मराठा समाजामध्ये कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याविषयी अनेक मतमतांतरे आणि संभ्रम आहे.कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याअगोदर जन्मलेल्या तुमच्या रक्तनाते संबंधातील म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्त्त्या/आजोबा/पणजोबा/खापर पणजोबा किंवा आजोबांचे चुलते/पणजोबांचे चुलते यापैकी कुठल्याही एका नातेवाईकांचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

जातीचा पुरावा कसा मिळवायचा?

तुमच्या रक्तनाते संबंधातील कुणबी जातीचा पुरावा मिळवण्यासाठी तुम्हाला संबंधित नातेवाईकाचा प्राथमिक शाळेचा दाखला किंवा निर्गम उतारा काढून त्यावर कुणबी नोंद आहे की नाही ते तपासावे लागेल.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संबंधित गावातील जन्म मृत्यू नोंद आणि जातीची नोंद कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर.१४ मध्ये ठेवली जात असे.पूर्वी या नोंदी घेण्याचे काम कोतवाल करत असत.आणि दर महिन्याला या नोंदी तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केल्या जात असत.परंतु १ डिसेंबर १९६३ सालापासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले.

त्यामुळे गावपातळीवरील जन्म मृत्यू नोंद करण्याचे काम संबंधित गावाच्या ग्रामसेवकांकडे देण्यात आले.तुम्हाला तुमच्या रक्त नाते संबंधातील व्यक्तीची कुणबी नोंद हवी असल्यास तुम्ही संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज करून कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर.१४ बुकाची नक्कल मागवून त्यात तुमच्या रक्त नाते संबंधातील व्यक्तीची कुणबी नोंद आहे की नाही?हे चेक करू शकता.

तसेच जन्म मृत्यू नोंद,वारस नोंद,जमीन वाटपाच्या नोंदी, ७/१२ उतारे,८अ उतारे,भाडेपट्टा,खरेदीखत ही महसुली कागदपत्रे आमलात येण्यापूर्वी इतर कागदपत्रे पूर्वी वापरली जात होती.जसे की क.ड.ई पत्र,खासरा पत्रक,हक्कपत्र, सुडपत्र ही महसुली कागदपत्रे अस्तित्वात होती.त्यामुळे या कागदपत्रांमध्ये आपल्या रक्तनातेवाईकांची कुणबी जातीचा उल्लेख आहे का? हे चेक करता येणार आहे.त्यासाठी तुम्हाला ही जुनी कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयातुन काढावी लागणार आहेत.

तुमच्या रक्त नाते संबंधातील एखादी व्यक्ती जर शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नोकरी करत असल्यास त्यांच्या सर्व्हिस बुकाच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने कुणबी जातीचा उल्लेख केला असल्यास त्या कागदपत्राचा साक्षांकित केलेला पुरावा घ्यावा.त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील किंवा रक्त नाते संबंधातील एखाद्या व्यक्तीकडे कुणबी जातीचे नोंद असलेले प्रमाणपत्र असल्यास ते देखील तुम्ही जातीचा पुरावा म्हणून दाखल करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment