Land Ownership Check
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन नसताना देखील जमीन विक्री करायची आहे म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्याचे आपण ऐकले आहे.
Table of Contents
परंतु आता अशा घटनांची मनात भीती निर्माण होण्याचे कारण नाही.महाराष्ट्र राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून सातबारा आठ-अ उतारे,जमिनीचा नकाशा,जमिनीचे पत्रक ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यामुळे जमिनी विषयी कोणताही व्यवहार होण्यापूर्वी ही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार आहेत.
यासाठी तुम्हाला महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ही कागदपत्रे तपासावी लागणार आहेत. जेणेकरून भविष्यात आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.सदरची माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी तपासायची(Land Ownership Check ) याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.चला तर मग जाणून घेऊयात.
हे पण वाचा:- आता ७/१२ आणि ८-अ उतारा महा ई सेवा केंद्रात मिळणार फक्त २५ रुपयांत!
जमिनीची मालकी आणि क्षेत्र तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा Land Ownership Check
•सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील इंटरनेट ब्राऊझर मध्ये जाणून आपल्याला राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.त्याची लिंक आम्ही खाली देत आहेत.
•वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे.
•तुम्हाला जमिनीचा ७/१२ उतारा पाहायचा असेल तर ७/१२ हा पर्याय निवडायचा आहे.
•तुम्हाला जर जमिनीचा ८-अ म्हणजे शेतकऱ्याचे नावे त्या गावात एकूण किती जमीन आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ८-अ या नावासमोरील रकान्यात क्लिक करायचे आहे.
•तुम्हाला ज्या जिल्ह्यातील माहिती हवी आहे तो जिल्हा निवडायचा आहे.
•पुढे तालुका निवडायचा आहे.
•आता आपल्याला ज्या गावातील माहिती हवी आहे त्या गाव निवडायचे आहे.
•आता आपण आपल्याला ज्या व्यक्तीची माहिती जाणून घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या जमिनीचा गट नंबर माहित असेल तर सर्वे नंबर/गट नंबर या पर्यायावर क्लिक करून गट नंबर टाकायचा आहे.
•गट नंबर टाकून झाल्यानंतर पुढील रकान्यातील शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•तुम्हाला जर जमिनीचा गट नंबर माहित नसेल तर तुम्ही व्यक्तीचे पहिले नाव/मधील नाव/आडनाव/संपूर्ण नाव या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे.
•तुम्ही निवडलेल्या पर्यायापैकी त्या व्यक्तीचे नाव टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•आता तुमच्या समोर सदरच्या गावातील त्या नावाच्या सर्व व्यक्तीच्या नावाची यादी ओपन होईल त्यापैकी तुम्हाला ज्या व्यक्तीची माहिती जाणून घ्यायची आहे त्या नावावर क्लिक करायचे आहे.
•अशा प्रकारे तुम्ही कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे हे ऑनलाईन पद्धतीने अगदी मोफत चेक करू शकणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.