Mahabhulekh :- आता सात बारा आणि आठ अ उतारा तसेच वारस नोंद होणार फक्त 25 रुपयांत,पहा शासन निर्णय!

Spread the love

Mahabhulekh:- नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.शेतीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी सात बारा उतारा आणि आठ अ उतारा ही कागदपत्रे खूप महत्वाची असतात. सात बारा उताऱ्यावरून जमिनीचा मालकी हक्क कोणाचा आहे याची माहिती मिळते.तसेच आठ अ उताऱ्यावरून शेतकऱ्याच्या नावावर एकूण किती क्षेत्र आहे याची माहिती मिळते.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सात बारा उतारा, आठ अ उतारा तसेच इतर ई फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.हे सर्व ई फेरफार उतारे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.आता सदरचे उतारे काढण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.आपण आपल्या मोबाईल वरून देखील सदरचे उतारे ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकणार आहेत.

महा ई सेवा केंद्रात मिळेल सुविधा

ज्या नागरिकांना आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने उतारे काढणे शक्य नाही त्यांना आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र यांसारख्या ठिकाणी सदरचे उतारे काढून मिळणार आहेत.काही महा ई सेवा केंद्र चालक नागरिकांची पिळवणूक करून जास्तीचे पैसे वसूल करीत असत.त्यामुळे या गोष्टीला आळा बसावा म्हणून शासनाने नवीन शासन निर्णय काढला आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार 600 रुपये!

काय आहे शासन निर्णय?

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं.७/१२,८-अ उतारा संगणकीकृत करण्यात आले असून संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांची नक्कल काढण्यासाठी शासन निर्णयान्वये फी निश्चित करण्यात आली आहे.आता ७/१२,८-अ उतारा साठी २५ रुपये फी नागरिकांकडून ग्राहक सेवा केंद्र चालकाने घ्यावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार अर्ज नोंदवण्यासाठी निश्चित दर

१.ई करार ₹२५/- दोन पृष्ठ संख्या
२.बोजा दाखल करणे/गहाणखत ₹२५/-
३.बोजा कमी करणे ₹२५/-
४.वारस नोंद ₹२५/-
५.मयताचे नाव कमी करणे ₹२५/-
६.अ.पा.क शेरा कमी करणे ₹२५-
७.एकुम्या (एकत्र कुटुंब प्रमुख) नोंद कमी करणे ₹२५/-
८. विश्वस्थांचे नाव बदलणे ₹२५/-

७/१२,८-अ उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment