Land Record Maharashtra:- जमीन खरेदी विक्री करताय तर हे नवीन नियम आपल्याला माहितीच असायला हवेत!

Spread the love

Land Record Maharashtra

Land Record Maharashtra
नमस्कार शेतकरी बंधूंनो,आमच्या एमएचखबर वेबसाईट वर आपले स्वागत आहे.आज एका नवीन विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.शेती म्हटले की तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय.शेती या शब्दापासूनच शेतकरी हा शब्द निर्माण झाला.महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात जमीन खरेदी विक्री चे व्यवहार नेहमी सुरूच असतात.परंतु खरेदी विक्रीचे नियम जर आपणास माहीत नसतील तर आपली फसवणूक देखील होऊ शकते नसता आपल्याला पस्तावा करण्याची देखील वेळ येऊ शकते.त्यासाठी खरेदी विक्री करताना काही महत्वाचे मुद्दे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

जमीन खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी

शेतजमीन खरेदी करताना ज्या क्षेत्राची आपण खरेदी घेणार आहोत त्या क्षेत्राचा सातबारा उतारा आपण संबंधित गावाच्या तलाठ्यांकडून प्राप्त करून घेऊ शकता.सदर सात बारा उताऱ्यावरील क्षेत्र हे वर्ग १ आहे का? याची खात्री करून घ्यावी.जमीन वर्ग १ असेल तर मूळ मालकाला खरेदी देण्यास काही अडचण येत नाही.परंतु क्षेत्र हे वर्ग २ चे असेल तर ती जमीन ही कुळकायद्याने मोफत मिळालेली असते त्याचा विक्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रांत अधिकारी यांच्या परवानगीची गरज असते.

तसेच त्या उताऱ्यात झालेल्या फेरफार नोंदी ची देखील माहिती आपल्याला असावी लागते.७/१२ उतारा आणि ८ अ उतारा यांमधील क्षेत्र हे मिळतेजुळते आहे का याची तपासणी करावी.

खरेदी खत करून घेणे( Land Record Maharashtra)

जमीन खरेदी करण्यासाठी सर्वात महत्वाचे हे खरेदी खत बनवून घेणे असते.तालुकास्तरीय दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी खत बनवून घेता येते.खरेदी खत झाल्यानंतर काही विशिष्ट कालावधी नंतर खरेदी केलेल्या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर आपले नाव लागले की नाही? याची खात्री करून घ्यावी.त्याच बरोबर जमिनीचा नकाशा देखील तपासून पाहणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:- राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार एकरी 50 हजार रुपये!

जर आपण जमीन विक्री करत आहात तर पूर्ण रक्कम आपल्याला मिळाल्याशिवाय खरेदी खत करू नये तसेच ज्या क्षेत्राची आपण विक्री करणार आहोत त्याच सात बारा उताऱ्यावर असलेल्या क्षेत्राची नोंद होत आहे का याची खात्री करुन घ्यावी.

खरेदी खत म्हणजे काय?

जमिनीचा खरेदी विक्री चा झालेला व्यवहाराचा पुरावा म्हणजे खरेदी खत होय.शक्यतो पैशाची देवाणघेवाण झाल्याखेरीज खरेदी खत करणे धोक्याचे ठरते.कारण खरेदी खत म्हणजे मूळ मालकाने जमिनीचा पूर्ण हक्क नवीन मालकाकडे देणे असा होतो.

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत झाल्यानंतर काही दिवसांत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोटीस काढली जाते आणि नोटीसांवर सह्या झाल्यानंतर सात बारा उताऱ्यावर नवीन मालकाचे नाव लागले जाते.
खरेदी खत करण्यापूर्वी संबंधित गावातील दुय्यम निबंधक यांच्या कडून जमिनीचे मूल्यांकन करून घेणे गरजेचे असते.तसेच मुद्रांक शुल्क काढून खरेदी खताची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

नमुना नंबर ८ आणि पोट खराब म्हणजे काय?

नमुना नंबर ८ म्हणजे संबंधित शेतकऱ्याची एकूण जमिनीचे क्षेत्र होय.आणि पोट खराब म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जमिनीचा काहीही न उगवू शकणारा परंतु शेतकऱ्याचे नावे असलेला जमिनीचा भाग होय.


जमीन खरेदी करताना इतर कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या?

१.जमिनीसाठी असणारा रस्ता
२.जमीन आरक्षित आहे का?
३.सात बारा उताऱ्यावर इतर हक्कात असलेली व्यक्तींची नावे.
४.जमिनीवरील बोजा तसेच न्यायालयीन खटला
५.जमिनीची चतुर सीमा

तर शेतकरी मित्रांनो आपण जमीन घेण्याच्या विचारात असाल तर वरील मुद्द्यांचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment