New Land Record
New Land Record
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईटवर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखामधून राज्य सरकारच्या एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रती एकरी 50 हजार रुपये भाडे राज्य सरकार देणार आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना 2.0’ अस या योजनेला नाव देण्यात आले आहे.
राज्यातील त्याचबरोबर देशातील वाढते प्रदूषण तसेच त्याचबरोबर वाढते कार्बन उत्सर्जन चिंतेचा विषय बनला आहे.त्यामुळे सरकार अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर भर देत आहे.राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
आपल्याकडे भरपूर प्रमाणात असलेल्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर सौर ऊर्जेसाठी करण्यात येत आहे.सौर ऊर्जेपासून मोठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा निर्माण केली जाणार आहे.महाराष्ट्र राज्य वीज पुरवठा मागणीत अग्रेसर आहे.राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना 2.0’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.New Land Record
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने अकोला जिल्ह्यात 216 एकर जमीन अधिग्रहित केली आहे.त्यामुळे लवकरच या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना 12 तास वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.त्यामुळे औद्योगिक वीज पुरवठ्यावरील क्रॉस सबसिडीचा देखील भार कमी होणार आहे.
विजेच्या मागणीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे.राज्यात वीज पंपांची संख्या एकूण 45 लाख आहे.एकूण वीज वापरापैकी 22% इतका वीज वापर शेतीसाठी करण्यात येतो.तोच वीजवापर सौर ऊर्जेच्या माध्यमातून 30% पर्यंत करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. सदर प्रकल्प राबविण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात शेतजमिनीची गरज भासणार आहे.
New Land Record
सरकार आवश्यक असलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेणार आहे.शेतकऱ्यांना मोबदला म्हणून प्रती हेक्टरी वार्षिक 1 लाख 25 हजार रुपये दिले जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सब स्टेशन जवळ असलेल्या जमिनींमध्ये असे प्रकल्प उभे केले जातील.त्यासाठी मोठमोठ्या उद्योगपतींनी देखील आपली तयारी दाखविली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.