Loan Scheme:- आता आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळणार 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज,जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Spread the love

Loan Scheme
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील मराठा तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांना उद्यमी बनवण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती.या योजनेच्या माध्यमातून मराठा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या(Loan Scheme) व्याजाची रक्कम महामंडळाकडून भरली जात आहे.

आता महामंडळाने नवीन योजना(Loan Scheme) जाहीर केली आहे.या योजनेअंतर्गत समूहातून व्यवसाय सुरू करणाऱ्यांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.तसेच व्याजाचा परतावाही सरकारच्या माध्यमातून भरला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती

•अर्जदार व्यक्ती मराठा समाजातीलच असावी.
•अर्जदार व्यक्तीचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.
•अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये असावी.
•अर्जदार व्यक्तीने संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
•अर्जदार व्यक्तीने संबंधित व्यवसायाचा प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:- आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरू,आता 15 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येणार!

अर्ज कुठे करायचा?Loan Scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मराठा तरुणांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सोबत असावी लागणार आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून महामंडळाच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.

योजनेची वैशिष्ट्ये

•मराठा समाजातील तरुणांनी समूहातून व्यवसाय केल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.
•कर्जाचा पूर्ण व्याज परतावा महामंडळाकडून भरण्यात येणार आहे.
•या योजनेला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भविष्यात कर्जाची मर्यादा आणखी वाढविली जाऊ शकते.
•अर्जदार व्यक्तीला संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीला व्यवसायातील बारकावे लक्षात येतील आणि भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचे कौशल्य प्राप्त होईल.

योजनेचे फायदे

•राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
•मराठा तरुणांना उद्यमी बनविण्याची संधी मिळेल.
•जास्तीत जास्त तरुण वर्ग व्यवसायाकडे आकर्षित केला जाईल.
•राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
•तरुणांच्या हाताला रोजगार भेटेल.
•समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment