मागेल त्याला सोलर पंप योजना 2024; Magel Tyala Solar Pump Yojana 2024 Check All Details Free

Spread the love

Magel Tyala Solar Pump Yojana 2024
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे.या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.राज्यातील अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर 2030 पर्यंत 40 टक्के पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने “मागेल त्याला सोलर पंप योजना” ही योजना सुरू केली आहे.

काय आहे योजना?Magel Tyala Solar Pump Yojana

अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा करून राज्यात “मागेल त्याला सौर पंप” (Magel Tyala Solar Pump Yojana) ही योजना सुरू केली जाणार आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख सौर कृषी पंपांचे वितरण केले जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप पर्यंत वीज कनेक्शन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुफ टॉप सोलर योजना सुरू करण्याचे घोषित केले आहे.देशातील सौर ऊर्जेचा वापर वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

योजनेचे काय फायदे होणार?

•शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार.
•लाईट बिलापासून कायमची सुटका होणार.
•कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत.
•पाण्याची उपलब्धता वाढणे.
•शाश्वत शेती
•पिकांच्या उत्पादनात वाढ

कोण कोण पात्र असणार?मागेल त्याला सोलर पंप योजना

•अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
•शेतकऱ्यांकडे विजेचा पुरवठा नसावा.
•स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
•सात बारा उताऱ्यावर विहीर किंवा बोअरची नोंद असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी जमा होणार 6000 रुपये,शेतकऱ्यांची यादी जाहीर,यादीत तुमचे नाव आहे का?येथे चेक करा!

अर्ज कुठे करायचा?

•सदरच्या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
•ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://mahadiscom.in/solar/index.html या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
•तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल.

अधिक माहितीसाठी

जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन सदर योजने विषयी सखोल तसेच अधिकची माहिती जाणून घ्यावी.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment