MAHA DES Recruitment 2023 :- अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,81 हजार रुपये पगार!

Spread the love

MAHA DES Recruitment 2023

MAHA DES Recruitment 2023
अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.05 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,अतिरिक्त आवश्यक अर्हता,वय इत्यादी माहिती आपण पाहणार आहोत.

MAHA DES Recruitment 2023

विभागाचे नाव – अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई

एकूण रिक्त पदे- 260 पदे

रिक्त पदांचा तपशील –
1.सहाय्यक संशोधन अधिकारी गट – ब (अराजपत्रित)
39 पदे
2.सांख्यिकी सहाय्यक गट – क – 94 पदे
3.अन्वेषक, गट – क 127 पदे

नियुक्तीचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1.सहाय्यक संशोधन अधिकारी गट – ब (अराजपत्रित)मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्रि / गणीत /अर्थशास्त्र /इकॉनॉमिक्स /
गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी.
2.सांख्यिकी सहाय्यक गट – कमान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमिक्स
विषयातील पदव्युत्तर पदवी.
3.अन्वेषक, गट – कमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

अतिरिक्त आवश्यक अर्हता
सहाय्यक संशोधन अधिकारी,गट ब (अराजपत्रित),सांख्यिकी सहाय्यक व अन्वेषक,गट क पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक — प्रशिक्षण 2000/ प्र.क्र.61/2001/39,दिनांक 19/03/2003 नुसार संगणक हाताळणी व वापराबाबतचे खाली नमूद केलेले प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आणि सादर करणे आवश्यक आहे.

D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B
स्तर किंवा C स्तरापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
किंवा
महाराष्ट्र राज्य ,उच्च व तंत्रशिक्षण मंडळ ,मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT अथवा GETC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
लेखी परीक्षा
वरील पदांसाठी गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – ₹1000/-
मागास प्रवर्ग – ₹900/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
15 जुलै 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
05 ऑगस्ट 2023

मुळ जाहिरात PDF 📝येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा
MAHA DES Recruitment 2023

How to apply for MAHA DES Recruitment 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 05 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment