MAHABOCW:- महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य,APPLY NOW

Spread the love

MAHABOCW

MAHABOCW
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे.त्यासाठी सरकारने mahabocw.in हे पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.

अर्थसहाय्य मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना आपली ऑनलाईन पद्धतीने mahabocw.in या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.त्यासाठी त्यांना घरबसल्याही ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे.तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे असणार आहे.

काय आहे MAHABOCW पोर्टल?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने राज्यातील बांधकाम क्षेत्रातील विविध कामगारांना अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या उद्देशाने Mahabocw.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना दोन ते पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
MAHABOCW Portal Eligibility

•अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
•अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असावे.
•नोंदणी करू इच्छिणाऱ्या कामगाराने 90 दिवस कामगार म्हणून काम केले असल्याचा ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

१.ओळखीचा पुरावा
२.आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
३.पॅन कार्ड
४.रहिवाशी पुरावा
५.रेशन कार्ड
६.मागील महिन्याचे लाईट बिल
७.वयाचा पुरावा
८.जन्माचा दाखला
९.शाळा सोडल्याचा दाखला
१०.बँक पासबुक झेरॉक्स IFSC कोड सहित
११.ठेकेदार/विकासक/ग्रामसेवक/नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे अधिकृत व्यक्ती यांनी मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.

या बांधकाम कामगारांना मिळणार योजनेचा लाभ

इमारत किंवा इतर बांधकामाचे काम जसे की बांधकाम,फेरबदल,दुरुस्ती,देखभाल किंवा पाडणे हे काम करणारे कामगार पात्र असतील.त्यांचे प्रकार खालील प्रमाणे.

•इमारत,रस्ते,रेल्वे मधील बांधकाम कामगार
•ट्रामवे,हवाई क्षेत्र,सिंचन, ड्रेनेज, तटबंद आणि जलवाहतूक मधील बांधकाम कामगार
•पूर नियंत्रण कामे,वीज पारेषण,पाण्याची कामे,तेल आणि वायू प्रतिष्ठापन मधील कामगार
•इलेक्ट्रिक लाईन्स,वायरलेस,रेडिओ,दूरदर्शन,दूरध्वनी, टेलिग्राफ आणि ओव्हारसिज कमुनिकेशन्स,धरणे,कालवे मधील कामगार
•जलाशय,जलकुंभ,बोगदे,पुल,मार्गे,जलवाहिनी,पाइपलाइन,टॉवर्स,कुलिंग टॉवर्स मधील कामगार
•ट्रान्समिशन टॉवर आणि इतर कामे,दगड तोडणे आणि बारीक करणे, फरशा किंवा फरशा कापून पॉलिश करणे, पेंट,वार्निश,सुतारकाम, गटार आणि प्लंबिंग,वायरिंग,वितरण, टेंशनिंग,अग्निशामक यंत्रांची स्थापना आणि दुरुस्ती,स्वयंचलित लिफ्टची स्थापना,सुरक्षा दरवाजे आणि उपकरणे बसविणे मधील कामगार.


•लोखंडी किंवा धातूच्या ग्रिल्स,खिडक्या,दरवाजे तयार करणे आणि स्थापित करणे,सिंचन पायाभूत सुविधांचे बांधकाम,सुतारकाम,आभासी छत,प्रकाशयोजना,प्लास्टर ऑफ पॅरिस यासह अंतर्गत काम,काच कापणे,काच प्लास्टर करणे आणि काचेचे पॅनल बसवणे मधील कामगार.
•विटा,छप्पर इ.तयार करणे,कारखाना अधिनियम 1948 अंतर्गत समाविष्ट नाही,सौर पॅनल इत्यादी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची स्थापना, स्वयंपाकासारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोड्युलार युनिट्सची स्थापना करणारे कामगार
•सिमेंट काँक्रिट साहित्य तयार करणे आणि बसवणे इ.,जलतरण तलाव, गोल्फ कोर्स इत्यादी सह क्रीडा किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम,माहिती फलक,रस्ते, फर्निचर,प्रवासी निवारे किंवा बस स्थानके,सिग्नल यंत्रणा बांधणे किंवा उभारणे.रोटरी बांधणे,कारंजे बसवणे इ.सार्वजनिक उद्याने,पदपथ,नयनरम्य भूभाग इत्यादींचे बांधकाम करणारे कामगार.

हे पण वाचा:- राज्यातील नागरिकांना दिवाळीत भेटणार आनंदाचा शिधा, फक्त 100 रुपयांत मिळणार या सहा वस्तू

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

१.कामगारांची सामाजिक सुरक्षा
•नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी 30 हजार रुपये अर्थसहाय्य मिळते.
•कामगारांना व्यक्तिमत्त्व विकास पुस्तक संचाचे वितरण केले जाते.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साधनांच्या खरेदीसाठी 5000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
•नोंदणीकृत कामगारांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना उतरविला जातो.
•नोंदणीकृत कामगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविली जाते.

२.नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य

•1ली ते 7वी मध्ये शिकणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना 2500 रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य आणि इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी 5000 रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी 10वी आणि 12वी मध्ये 50% किंवा त्याहून जास्त गुण मिळविल्यास 10,000 रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना किंवा पत्नीला पदवीच्या प्रथम,द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रती वर्ष 20,000 रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना किंवा पत्नीला वैद्यकीय पदवीसाठी 1 लाख रुपये आणि इंजिनिअरिंग साठी 60,000 रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना डिप्लोमा कोर्ससाठी 20,000 रुपये आणि पदव्युत्तर डिप्लोमा कोर्ससाठी 25,000 रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना MS-CIT अभ्यासक्रमासाठी संपूर्ण अर्थसहाय्य.

३.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आरोग्यासाठी अर्थसहाय्य

•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन जिवंत मुलांना नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये आणि सिझेरीयन ऑपरेशनद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गंभीर आजारांच्या उपचारांसाठी 1 लाख रुपयांची वैद्यकीय मदत.
•जर नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या जोडीदाराने पहिल्या अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन ऑपरेशन केले तर ती मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत तिच्या नावाने 1 लाख रुपयांची मुदत ठेव केली जाईल.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 75% किंवा त्याहून जास्त कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये अर्थसहाय्य.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ.

४.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य

•नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत
•नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बँकेकडून घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी करण्यासाठी कर्ज घेतल्यास 2 लाख रुपये अनुदान किंवा 6 लाख रुपयांच्या कर्जाच्या व्याजासाठी अनुदान दिले जाईल.
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या अंत्यविधीसाठी 10,000 रुपये अर्थसहाय्य
•नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा/विधुरास 24,000 रुपयांची 5 वर्षांसाठी आर्थिक मदत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment