PM Kusum Solar Pump Yojana| केंद्र सरकार देणार ९०% अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप,अनुदानाच्या रकमेत वाढ!

Spread the love

PM Kusum Solar Pump Yojana

PM Kusum Solar Pump Yojana
नमस्कार शेतकरी बंधूंनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आले आहे.कुसुम सोलर पंप ( Kusum Solar Pump) साठी सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी सोलर पंपासाठी ९०% अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले आहे.याबाबत नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

पीएम कुसुम सोलर पंप योजना

दिवसेंदिवस सिंचनाच्या सुविधेसाठी वाढत चाललेला खर्च समोर ठेवून शासन शेतकरी हितासाठी सिंचनाच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहे.सिंचनासाठी डिझेल च्या वाढलेल्या किंमती मुळे सर्वच शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करणे शक्य नाही.त्यासाठीच लोकप्रिय असणारी पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ९०% अनुदान शासन देत आहे.

PM Kusum Solar Pump Yojana
सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनामार्फत ९५% अनुदान देण्यात येणार आहे.

PM Kusum Solapr Pump Yojana
आवश्यक कागदपत्रे

1.सातबारा उतारा
2.शेतात कूपनलिका असल्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे.
3.त्याचबरोबर एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटदारांचे संमती पत्र २०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर देणे देखील बंधनकारक आहे.
4.आधार कार्ड झेरॉक्स
5.बँक पासबुकची झेरॉक्स
6.पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.

कुसुम सोलर पंपाकरिता लाभार्थ्यांनी भरावयाची रक्कम


३ एच पी पंपाची किंमत ही १लाख ९३ हजार ८०३ रुपये असून त्याकरिता लाभार्थी हिस्सा हा खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यास १९ हजार ३८० रुपये असणार आहे.

५ एच पी पंपाकरीता २६ हजार ९७५ रुपये असणार आहे तसेच ७.५ एच पी पंपासाठी ३७ हजार ४४० रुपये असणार आहे.

सदर योजनेचा फॉर्म भरण्याकरिता आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून फॉर्म भरावयाचा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment