Milk Subsidy
राज्यातील सर्व दूध उत्पादकांचे आर्थिक हित लक्षात घेवून सहकारी दूध उत्पादक संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकांना प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आज अखेरच्या दिवशी सर्व आमदार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून ५ रुपये अनुदानाचा(Milk Subsidy) निर्णय जाहीर केला.
ही अनुदान योजना ही राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असून, याकरिता सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ करिता प्रतिलीटर किमान २९ रुपये दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.