मिनी डाळ टाकून लाखो रुपये कमवा,सरकार देतय 2.70 लाख रुपये अनुदान,असा करा अर्ज! Mini Dal Mill Yojana Maharashtra 2023

Spread the love

Mini Dal Mill Yojana Maharashtra 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध करण्यासाठीच या योजना राबविल्या जातात. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत केली जाते.

मिनी डाळ मिल योजना

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना राज्यात राबविल्या जातात.मिनी डाळ मिल साठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत “उन्नत शेती समृद्ध शेतकरी” या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाते.

कडधान्यांपासून डाळ तयार करण्यासाठी मिनी डाळ मशीनचा वापर केला जातो.या उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले पैसे देखील मिळतात.तसेच ही मशीन खरेदी करण्यासाठी शासन अनुदान देखील देत आहे.आज या लेखाच्या माध्यमातून आपण मिनी डाळ योजनेच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:- आता ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार तब्बल ५० लाख रुपये अनुदान!

किती अनुदान मिळते?Mini Dal Mill Yojana Subsidy

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती,अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच महिला शेतकरी यांना ६० टक्के म्हणजेच जास्तीत जास्त २.७० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के म्हणजेच जास्तीत जास्त २.२५ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

•अर्जदाराचे आधारकार्ड
•बँक पासबुक झेरॉक्स
•जातीचा दाखला
•जमिनीचा ७/१२ उतारा
•जमिनीचा ८-अ उतारा
•शेतकऱ्याचे हमीपत्र
•दुकानदाराचे जीएसटी बिल

मिनी डाळ मिल साठी अर्ज कुठे करायचा?

मिनी डाळ मिल योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment