Namo Shetkari Yojana:- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी योजनेकरीता 1720 कोटी रुपयांचा निधी मंजूर!

Spread the love

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारने सबंध देशभर राबविल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती.

काय आहे नमो शेतकरी योजना?
Namo Shetkari Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० रुपये दिले जातात.ही रक्कम तीन विविध टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी आपल्या योजनेच्या अंतर्गत वर्षाकाठी १२००० रुपये मिळणार आहेत.

हे पण वाचा:- या यादीत नाव असेल तर मिळणार १२०००/- रुपये!

नमो शेतकरी योजना शासन निर्णय
Namo Shetkari Yojana

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष प्रति शेतकरी ६००० रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी ६००० रुपये इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

तसेच सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करणेसाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी साठी एक अशी एकूण दोन खाती आयुक्त कृषि यांचे नावे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

आयुक्त (कृषि),कृषि आयुक्तालय, पुणे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (एप्रिल ते जुलै महिना) ₹१७२० कोटी इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment