शेतकऱ्यांनो आता युरियाच्या गोणीला करावे लागणार बाय बाय,त्याऐवजी मिळणार हे जबरदस्त प्रॉडक्ट,केंद्र सरकारचा मोठा निर्णय!Nano Urea

Spread the love

Nano Urea
देशातील शेतकरी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर युरिया वापरत असतात.त्यासाठी भारत सरकारला इतर देशांमधून युरिया आयात करावा लागतो.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.केंद्र सरकारने युरिया आयात पूर्णपणे बंद करण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.आपल्या देशात युरियाच्या गोणीला पर्याय म्हणून नॅनो युरियाची निर्मिती केली जात आहे.

केंद्र सरकारने देशात नॅनो युरिया निर्मितीसाठी स्वदेशी प्लांट उभारण्यात येणार आहेत.यासाठी देशातील विविध तीन भागांमध्ये प्लांट उभारण्यात आले आहेत.नॅनो युरिया प्लांटच्या माध्यमातून १७ कोटी नॅनो युरिया (Nano Urea) बॉटलची निर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे.या संदर्भातील माहिती आपल्या देशाचे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिली आहे.

त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की भारतात तीन ठिकाणी नॅनो युरिया प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील कलोल या ठिकाणी इफकोकडून प्लांट उभारण्यात आला आहे.तसेच उत्तर प्रदेश राज्यात फूलपुर आणि आंवला या दोन ठिकाणी नॅनो युरिया निर्मितीचे प्लांट उभे केले आहेत.या तीनही ठिकाणची प्लांट क्षमता ही १७ कोटी बॉटल असणार आहे.एका बॉटल ची क्षमता ५०० मिली असणार आहे.

हे पण वाचा:- शेतकरी हिताचा निर्णय,१ कोटी २० लाख एकर शेतजमीन होणार शेतकऱ्यांच्या मालकीची!

तसेच गुजरात राज्यातील आनंद येथे देखील ४.५ कोटी बॉटल वार्षिक क्षमता असलेला प्लांट उभारण्यात येणार आहे.अशी घोषणा देखील केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्थेत यशस्वी चाचणी
Nano Urea 17 Crore Bottle

भारतीय कृषी संशोधन संस्थेत आणि देशातील कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध ठिकाणी असलेल्या पिकांवर नॅनो युरियाची फवारणी करण्यात आली आहे. यामधून चांगला परिणाम दिसून आला आहे.त्यामुळे पिकांना जमिनीतून युरिया देण्याची गरज पडणार नाही. याचाच परिणाम म्हणून देशात युरिया आयात पुर्णपणे थांबणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

केंद्रिय कृषिमंत्री यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये युरियाच्या विक्रीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्के वाढ झाली आहे.या आर्थिक वर्षात यूरियाची विक्री २०७.६३ लाख टन नोंदविण्यात आली आहे.तर मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये १९२.६१ लाख टन यूरियाची विक्री नोंदविली गेली होती.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment