महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची भर पडणार, निर्मितीसाठी प्रस्ताव,नवीन संभाव्य जिल्ह्यांची यादी जाहीर!New Districts In Maharashtra

Spread the love

New Districts In Maharashtra
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टल वर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखामधून महाराष्ट्र राज्यात नवीन 22 जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावाची माहिती घेणार आहोत.1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.1 मे रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्यात एकूण 26 जिल्ह्यांची निर्मिती करण्याची परवानगी तत्कालीन सरकारने दिली.काही कालावधी नंतर या मध्ये अजून 11 नवीन जिल्ह्यांची भर पडली.त11 अतिरिक्त जिल्हे निर्माण केले गेले आहेत,त्यापैकी सर्वात अलीकडील पालघर जिल्हा आहे. राज्यात सध्या ३६ जिल्हे आहेत. हे जिल्हे सहा प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहेत.

राज्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अजून प्रस्तावित नवीन 22 जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे.त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिकांना काही प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालयात जावे लागते. गाव ते जिल्हा मुख्यालय यांतील अंतर जास्त असल्या कारणाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

New Districts In Maharashtra
त्यामुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती केल्यास नागरिकांना तसेच प्रशासनाला देखील कामकाज करण्यास सोयीचे होणार आहे.राज्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा पुरविली जाईल.

नवीन प्रस्तावित 22 जिल्ह्यांची यादीNew Districts In Maharashtra

1)लातूर त्याचबरोबर उदगीर जिल्ह्याचे विलीनीकरण प्रस्तावित आहे.

2)सध्याच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरत आहे.

3)रत्नागिरी मधून मनमाड जिल्हा निर्मिती प्रस्तावित आहे.

4)सातारा जिल्ह्यामधून नवीन माणदेश जिल्हा निर्मिती होणार असल्याचे कळते.

5)पुणे जिल्ह्यात देखील शिवनेरी जिल्हा निर्मितीची चर्चा जोर धरू लागली आहे.

6)रायगडचा उपयोग महाड जिल्हा निर्मितीसाठी केला जाऊ शकतो.

7)आता नव्याने ठाणे जिल्ह्यामधे पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.त्या पालघर जिल्ह्यामधून नवीन जव्हार जिल्हा निर्मिती करण्याची सूचना आहे.

8)त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे नवीन मिरा-भाईंदर आणि कल्याण जिल्हा निर्मिती प्रस्तावित आहे.

9)राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन तीन नवीन जिल्ह्यांमध्ये करण्याची सूचना आहे. शिर्डी,संगमनेर आणि श्रीरामपूर.

10)नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून नवीन मालेगाव आणि कळवण अशा दोन जिल्हा निर्मितीचे प्रस्तावित आहे.

11)गडचिरोली मधून अहेरी जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते.

12)चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन चिमूर जिल्ह्याची निर्मिती केली जावी अशी सूचना आहे.

13)भंडारा जिल्ह्याचे विभाजन साकोली जिल्ह्याची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.

14)यवतमाळ जिल्हा मधून पुसद जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते.

15)नवीन खामगाव जिल्हा निर्मिती बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून केले जाऊ शकते.

16)अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपुर जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते.

17)नांदेड जिल्ह्यात किनवट जिल्हा निर्मिती प्रस्तावित आहे.

18)जळगाव जिल्ह्याचे विभाजन भुसावळ जिल्हा निर्मिती साठी केले जाऊ शकते.

तर मित्रांनो वर नमूद केल्याप्रमाणे नवीन प्रस्तावित 22 जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी शासन विचाराधीन आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment