New E-scooter Launch
New E-scooter Launch
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.संपूर्ण जगभर प्रदूषण रहित वाहनांच्या खरेदीसाठी सरकार लोकांना प्रोत्साहन देत आहे.इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल खूप वाढला आहे.इलेक्ट्रिक वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.अशातच एका कंपनीने 200 किमी ची रेंज असणारी एक भन्नाट नवीन ई स्कूटर (New E-scooter Launch) तयार केली आहे.
लवकरच ही ई स्कूटर बाजारात लाँच होणार आहे.इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना लोकांमध्ये त्यांना पुन्हा पुन्हा चार्ज करावे लागत असल्याने चिंता होती.परंतु या नवीन स्कूटर मध्ये अतिरिक्त बॅटरी बॅकअपसह 200 किलोमीटरचा रेंज देण्यात आली आहे.
कोणती आहे ई स्कूटर बनवणारी कंपनी?
आपण Komaki SE Dual या ई स्कूटर बद्दल बोलत आहेत.कोमाकी या कंपनीने बाजारात नवीन ई स्कूटर आणली आहे.ही ई स्कूटर चारकोल ग्रे आणि सॅक्रामेंटो ग्रीन या दोन रांगांमध्ये उपलब्ध असणार आहे.तसेच ती सर्व सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत असणार आहे.या ई स्कूटरची किंमत 1.28 लाख रुपये(एक्स-शोरूम) असणार आहे.
Komaki SE Dual ची वैशिष्ट्ये
या ई स्कूटर मध्ये 125cc क्लासचे पॉवर समतुल्य असणार आहे.तसेच डिटेचेबल L-Ion बॅटरी, अँटी थेफ्ट सिस्टीम, वॉटर प्रुफ मोटर, लायसन्स प्लेट लॅम्प,मोठा फ्रंट स्टोरेज स्पेस,सेल्फ डायग्नोसी,मल्टीमीडिया बटन,पार्किंग असिस्ट, रिझरे असिस्ट हे वैशिष्ठ्ये असणार आहेत.तसेच या ई स्कूटर मध्ये 4 स्मार्ट बॅटरी वापरल्या आहेत आणि त्या देखील फायर प्रुफ असल्याचे सांगितले जात आहे.त्याचबरोबर स्कूटर मध्ये 3000 वॅटची मोटर जोडलेली आहे आणि स्मार्ट बॅटरी चार्ज होण्याकरिता 4 तास लागतात.
हे पण वाचा:- बाजारात येत आहे होंडाची ॲक्टिवा इलेक्ट्रिक,एका चार्जमध्ये 280 किमी धावणार!
Komaki SE Dual चे जबरदस्त फिचर्स
या EV स्कूटर मध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल डिजिटल असणार आहे.ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अँटी थेफ्ट अलार्म,युएसबी पोर्ट,क्रुझ कंट्रोल,एक्स्टर्नल स्पीकर,डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रीपमीटर,डिजिटल क्लॉक,लो बॅटरी अलर्ट, डबल डिस्क ब्रेक हे जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत.तसेच रायडिंग साठी 3 मोड असणार आहेत.ज्यामध्ये इको, स्पोर्ट्स आणि टर्बो मोडचा समावेश असणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.