MP Land Record| नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र सरकारने आपले भूमिअभिलेख चे जवळपास सर्व रेकॉर्ड आता ऑनलाईन केले आहे.सात बारा उतारा,८ अ उतारा,जुने फेरफार त्याच बरोबर शेतजमिनीचा नकाशा देखील आत्ता ऑनलाईन करण्यात आला आहे.
याचा फायदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीत जाण्यासाठी रस्ता करावयाचा झाल्यास तसेच जमिनीच्या हद्दी जाणून घेण्यासाठी होणार आहे. आता आपण जमिनीचा तसेच आपल्या गावाचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
१.जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp या वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
२.आता आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्या पेजच्या डाव्या बाजूला असलेला Location हा रकाना दिसेल यात आपल्याला आपले राज्य,जिल्हा,तालुका,गाव निवडायचे आहे. तसेच आपल्याला Category या पर्यायमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील.आपण जर ग्रामीण भागात असाल तर रुरल हा पर्याय निवडायचा आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा.
३.सर्वात शेवटी village map या पर्यायावर क्लिक करायचे आहे.MP Land Record
४.त्यानंतर आपल्या समोर आपल्या गावाचा नकाशा ओपन होईल आपण नंतर Home या पर्यायावरील आडव्या बाणावर क्लिक करायचे आहे म्हणजे आपल्याला हा नकाशा संपूर्ण स्क्रीन वर दिसेल.
हे पण वाचा:- राज्यात रोजगार हमी योजनेतून मिळणार १० लाख विहिरी आणि सात लाख शेततळी!
५.त्यानंतर आपण डावीकडील + आणि – या बटणावर क्लिक करून नकाशा मोठ्या किंवा लहान आकारात पाहू शकणार आहात म्हणजेच झूम इन आणि झूम आऊट करू शकणार आहेत.
६.आपल्या शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी आपल्याला या पेजवर Search by plot no. या रकान्यात आपल्या सात बारा उतारा मधील गट नंबर टाकायचा आहे.
७.गट नंबर टाकल्यानंतर तुमच्या शेतजमिनीचा नकाशा आपल्यासमोर ओपन होईल.
८.आता डावीकडे plot info या रकान्याच्या खाली आपण टाकलेल्या गट नंबर मधील क्षेत्र हे कोणाच्या नावे आहे आणि त्या गटात एकूण क्षेत्र किती आहे याची माहिती दिसेल.
९.या माहितीच्या सगळ्यात शेवटी आपल्याला map report हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपला plot report पाहू शकतो.नंतर उजवीकडील खाली दिशा असलेल्या बाणावर(Downword Arrow) वर क्लिक करून आपल्या शेतजमिनीचा नकाशा पाहू शकता.
तुमच्या शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा.