आता फोन पे आणि गूगल पे वरून मिळणार उसने पैसे,व्याज पण लागणार नाही,पहा किती पैसे मिळणार?वाचा संपूर्ण माहिती!

Spread the love

Phone Pay,Google Pay,Paytm
भारतात नोटबंदी झाल्यापासून रोख रकमेच्या व्यवहाराचे प्रमाण कमी झाले आहे.फोन पे,गूगल पे तसेच पेटीएम यांसारख्या यूपीआयचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.कोणत्याही व्यक्तीला कधीही ऑनलाईन पैसे पाठवणे आता यूपीआय मुळे सोपे झाले आहे.त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे यूपीआय ॲप्लिकेशन डिजिटल पेमेंट करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत.

फोन पे, गूगल पे तसेच पेटीएम वापर कर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.जर तुम्ही देखील यूपीआय वापर करत असाल तर तुमच्यासाठी देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरले जाणारे सर्व यूपीआय ॲप्लिकेशन एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालवली जातात.

अलीकडेच एनपीसीआय ने युपीआय पेमेंट साठी काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत.बदल करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२४ पासून करण्यात येणार आहे.आपण थोडक्यात जाणून घेऊया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय पेमेंट साठी कोणत्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत.चला तर मग सुरू करूया.

हे पण वाचा:- 1 जानेवारी पासून फोन पे,गूगल पे बंद होणार,तुमचे पण होणार का?जाणून घ्या संपूर्ण माहिती!

१.पहिला बदल
आता कोणत्याही यूपीआय वापर कर्त्याने फोन पे, गूगल पे तसेच पेटीएम किंवा इतर कोणत्याही यूपीआय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून २००० रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे पेमेंट केल्यास हे पहिले पेमेंट पूर्ण होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागणार आहे.त्याचबरोबर पेमेंट करणाऱ्या व्यक्तीला सदरचे पेमेंट चार तासांच्या आत कॅन्सल करता येणार आहे.आणि पेमेंटची रक्कम देखील बदलता येणार आहे.

२.दुसरा बदल
आता NPCI च्या नवीन गाईडलाईन्स नुसार एका यूपीआय आयडीद्वारे एका दिवसाला म्हणजेच २४ तासांमध्ये १ लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार आहे.

३.तिसरा बदल
शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालये यांना पेमेंट करण्यासाठी एका दिवसाची मर्यादा नवीन नियमानुसार ५ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.पूर्वी ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच होती.

४.चौथा बदल
पूर्वी एसआयपी,विमा प्रीमियम रक्कम तसेच इतर बँकिंग पेमेंट करण्यासाठी एका दिवसाला १५ हजार रुपयांची मर्यादा होती.आता हीच मर्यादा एका दिवसाला एक लाख रुपये करण्यात आली आहे.त्यामुळे यूपीआय वापरकर्त्याना मोठा दिलासा मिळणार आहे.

५.पाचवा बदल
सर्वसामान्य यूपीआय वापरकर्त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा निर्णय NPCI च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.आता यूपीआय वापरकर्त्यांना खात्यात पैसे नसले तरी देखील UPI Now या सुविधेद्वारे मर्यादित रकमेपर्यंत पेमेंट करता येणार आहे.विशेष बाब म्हणजे ही रक्कम ४५ दिवसांसाठी बिगरव्याजी उपलब्ध असणार आहे.या UPI Now सुविधेमुळे सर्वसामान्य यूपीआय वापर कर्त्यांना बिगर व्याजी पैसे उपलब्ध होणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment