Onion Rate
केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा उत्पादक असणाऱ्या देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.नोव्हेंबर २०२३ मध्ये गुलाबी कांद्याला बाजार समित्यांमध्ये प्रती क्विंटल चार ते साडे चार हजार रुपये भाव मिळत होता.काही ठिकाणी तर याहीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत होते.
सर्वसामान्य ग्राहकांना मात्र हाच गुलाबी कांदा किरकोळ बाजारात ८० रुपये किलो किंवा त्याही पेक्षा जास्त दराने खरेदी करावा लागत होता.यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सरकारच्या विरोधात नाराजी वाढत चालली होती.त्यामुळे केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारातील कांद्याचे दर कमी करण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याचा परिणाम कांद्याचा बाजारभावावर दिसून आला.किरकोळ बाजारात कांद्याला २५ रुपये किलो दराने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला.निर्यात बंदी केल्यामुळे देशाच्या अंतर्गत कांद्याची उपलब्धता वाढली.परंतु याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागला.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांनो हे काम करा,एकरी 50 हजार रुपये कमविण्याची संधी,पहा काय करायचे त्यासाठी?
मिळालेल्या माहितीनुसार कांदा निर्यात बंदी केल्यापासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत.घाऊक बाजारात कांद्याच्या किंमती प्रती क्विंटल ३५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.तसेच किरकोळ बाजारात देखील याचा परिणाम दिसून आला आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमती ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांच्या रोषाला मात्र सामोरे जावे लागत आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या निर्णयामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याचे दिसत आहे.
बाजार समित्यांमध्ये गुलाबी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.यामुळे देखील कांद्याचे भाव गडगडले आहेत.राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये गुलाबी कांद्याला १८०० ते २३०० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळत आहे.परंतु वाढलेला उत्पादन खर्च आणि उत्पादनामध्ये आलेली घट यामुळे शेतकऱ्यांना या बाजारभावाने देखील कांदा परवडत नसल्याचे बोलले जात आहे.
परंतु मीडिया रिपोर्टनुसार आता कांद्याचे भाव वाढणार असल्याचे बोलले जात आहे.केंद्र सरकार पुन्हा एकदा निर्यातबंदी उठविणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने कांदा निर्यात सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
खरीप हंगामात पिकविलेला गुलाबी कांदा साठवणूक करून ठेवता येत नाही.साठवणूक केल्यास कांदा टिकत नाही त्यामुळे बाजारात गुलाबी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.तसेच पुढे देखील ही आवक सुरूच राहणार आहे.याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याची उपलब्धता राहणार आहे.आणि आता दरामध्ये देखील वाढ होणार नाही त्यामुळे पुन्हा निर्यात सुरू केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.परंतु केंद्र सरकारकडून अजून कुठेही या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.आशा आहे की लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.