प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु,आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप,तुम्हाला मिळाले का? Pik Vima Latest News

Spread the love

Pik Vima Latest News
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.यंदा महाराष्ट्र राज्य सरकारने एक रुपयात खरीप पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा उतरविला होता.सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि रोग तसेच कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमेचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जाना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत.यापैकी ९६५ कोटी रक्कम वितरीत करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली.Pik Vima Latest News

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता १२ जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून ९ जिल्ह्यांमध्ये अंशतः आक्षेप आहेत. राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, वाशिम, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा ९ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.Pik Vima Latest News

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ १ रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण ८ हजार १६ कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

हे पण वाचा:-राज्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर!

पर्जन्यमान आणि पीक पेरणी
राज्यात ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या ८६ टक्के पाऊस (९२८.८ मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी ५८ लाख ७६ हजार हेक्टर पेरणीचे नियोजनअसून आत्तापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे.Pik Vima Latest News

गतवर्षी याच सुमारास १३ लाख ५० हेक्टर पेरणी झाली होती. या वर्षी १५ लाख ११ हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामांत ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून १७ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या ४५ टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २१.५२ लाख हेक्टर असून यावर्षी ५.६४ लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या २६ टक्के पेरणी झाली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment