Pipeline Subsidy
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजना राबविल्या जात असतात.शेतकऱ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास शेतीचे उत्पादन चांगल्या प्रकारे काढता येते.शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास पिकांची जोमाने वाढ होऊन उत्पन्न देखील चांगले मिळते.
Table of Contents
काय आहे योजना?
Pipeline Anudan Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाइप लाइन अनुदान योजना राबविली जात आहे.आत्तापर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सदर अनुदानाचा लाभ घेतला आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात पाइप लाइन करण्यासाठी अनुदान दिले जाते.जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?
Pipeline Subsidy
महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाइप लाइन साठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागणार आहे.यासाठी शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे.जर शेतात विहीर नसेल तर इतर कोणत्याही एका सिंचन सुविधेची नोंद असणे आवश्यक आहे.जसे की शेततळे,बोअरवेल,कूपनलिका इत्यादी.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता ट्रॅक्टर खरेदी साठी मिळणार तब्बल ५ लाख रुपये अनुदान!
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- सात बारा आणि आठ अ उतारा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचा दाखला (अनु.जाती/अनु.जमाती साठी)
- रेशन कार्ड
- आधार लिंक असलेले बँक खाते पासबुक
- पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र
- पाईप खरेदी केलेले जीएसटी बिल
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
अर्ज कुठे करायचा?
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाईप लाइन अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार महा डीबीटी या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.आपण आपल्या मोबाईलवरून देखील सदर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.आपल्याला जर शक्य नसेल तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन देखील अर्ज करता येणार आहे.
अनुदानाची रक्कम किती?
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाईप लाइन अनुदान(Pipeline Subsidy) योजनेसाठी एका शेतकरी लाभार्थ्यास अनुदानाची रक्कम ही पाईप खरेदी खर्चाच्या ५० ते ७५ टक्के दिली जाते.या साठी जास्तीत जास्त अनुदान मर्यादा ही १५ हजार रुपये देण्यात येते.
अर्जाची निवड कशी होते?
पाईप लाइन अनुदान योजनेसाठी आपले सरकार महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाते.यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जात नाही. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.