Tractor Anudan Yojana 2023 :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता ट्रॅक्टर साठी तब्बल 5 लाख रुपये अनुदान मिळणार,असा करा अर्ज!

Spread the love

Tractor Anudan Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या महा डीबीटी च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आधुनिकीकरण तसेच यांत्रिकीकरण साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

काय आहे योजना?
Tractor Anudan Yojana

महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून “कृषी यांत्रिकीकरण योजना/राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे,यंत्र आणि इतर साधने शेतकऱ्यांना अनुदानावर दिली जातात. सदरच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी साठी देखील अनुदान दिले जात आहे.

किती अनुदान मिळते?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी साठी सुरुवातीला 2WD/4WD – 8 बीएचपी ते 20 बीएचपी क्षमतेच्या ट्रॅक्टर खरेदी साठी सर्व साधारण प्रवर्गासाठी ७५ हजार रुपये तसेच SC/ST/महिला शेतकरी/अल्प भूधारक/बहु भूधारक प्रवर्गातील शेतकऱ्यांना १ लाख रुपये अनुदान दिले जात होते.2WD/4WD – 20 बीएचपी ते 40 बीएचपी तसेच 40 बीएचपी ते 70 बीएचपी क्षमतेच्या ट्रॅक्टर खरेदी साठी सर्व साधारण प्रवर्गासाठी १ लाख रुपये तसेच SC/ST/महिला शेतकरी/अल्प भूधारक/बहु भूधारक प्रवर्गातील शेतकऱ्यांना १ लाख २५ हजार रुपये अनुदान दिले जात होते.परंतु आता हेच अनुदान वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या अंतर्गत जुन्या विहीर दुरुस्तीसाठी मिळणार अनुदान!

अनुदानाच्या रकमेत होणार इतक्या रुपयांची वाढ
Tractor Anudan Yojana

Tractor Anudan Yojana

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान विभागाच्या उप मुख्य आयुक्त ए.एन.मेश्राम यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी देशातील अपर मुख्य सचिव(कृषी)/प्रधान सचिव(कृषी)/संचालक(कृषी)/यांत्रिकीकरण योजना राबवणारे नोडल राज्य अधिकारी/सर्व राज्य कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना एक परिपत्रक काढले आहे.या परिपत्रकानुसार अनुदान तत्वावर दिल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतील साधनांसाठी अनुदान वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता देशातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कृषी यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

ट्रॅक्टर साठी मिळणार ५ लाख रुपये अनुदान
Tractor Anudan Yojana

Tractor Anudan Yojana

आता नवीन झालेल्या निर्णयानुसार ट्रॅक्टर साठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अनुसूचित जाती/अनु.जमाती/अल्प भूधारक/महिला शेतकरी/ईशान्येकडील राज्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला जाणार आहे. ट्रॅक्टर साठी मिळणारे अनुदान खालील प्रमाणे

कोणाला मिळणार लाभ?

कृषी यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान उप आयुक्त भारत सरकार यांनी देशातील सर्व राज्यांना कृषी यांत्रिकीकरण औजारे तसेच इतर साधने यांसाठी अनुदान वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आपले अर्ज दाखल केले आहेत तसेच त्यांना अद्याप पर्यंत लाभ मिळाला नाही असे प्रतीक्षेत असणारे शेतकऱ्यांना आता नवीन नियमानुसार वाढीव अनुदान दिले जाणार आहे.तसेच इथून पुढे जे शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभासाठी आपला अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना वाढीव अनुदान दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Tractor Anudan Yojana

•शेतकऱ्याचे आधार कार्ड
•आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक
•मोबाईल क्रमांक
•जातीचा दाखला(अनु.जाती/अनु.जमाती साठी)
•शेत जमीनीचा ७/१२ व ८-अ उतारा)
•पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज कुठे करायचा?
Tractor Scheme Apply Online

शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तसेच ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आपले सरकार सेवा केंद्र तसेच महा डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज करावे लागणार आहेत.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment