PM AWAS YOJANA
PM Awas Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजच्या लेखामधून आपण प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.केंद्र सरकारने देशातील सर्व गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर देण्याचा निर्णय घेतला आहे.त्या दिशेने सरकार पाऊले टाकत आहे.
केंद्र सरकारने दरवर्षी देशातील लाखो कुटुंबांना पक्की घरे मिळावी म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली.या योजने अंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळू लागली.परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने वेगवेगळे निकष आणि अटी लावल्या आहेत.PM Awas Yojana
जर तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी राहत असाल तर त्या ठिकाणची प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी काही वेगळे निकष आहेत.ते आपण जाणून घेणार आहेत.PM Awas Yojana
हे पण नक्की वाचा:- या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री सन्मान निधीचा पहिला हप्ता
मुंबई सारख्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना देखील पक्की घरे बांधण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे.मुंबईत राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने वार्षिक उत्पन्न मर्यादा ही कमाल 6 लाख रुपये इतकी ठेवली आहे.
जर तुमची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाख रुपयांच्या खाली असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.एका कुटुंबातील पती ,पत्नी किंवा अविवाहित मुलगा यांच्यापैकी कोणीही अर्ज करू शकता.
PM Awas Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्के घर नसावे.तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे इतर ठिकाणी पक्के घर नसणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशातील जवळपास 20 लाख कुटुंबांना पक्के घर देण्याचा निर्णय 1 मार्च 2022 रोजी घेण्यात आला.
परंतु अलीकडच्या काळात वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने जवळपास 2.95 कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे कच्च्या मातीच्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे पक्क्या घरात राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.