NAMO Shetkari Yojana| शेतकऱ्यांसाठी खुशखबर या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री सन्मान निधीचा पहिला हप्ता,वाचा सविस्तर माहिती

Spread the love

NAMO Shetkari Yojana

NAMO Shetkari Yojana|
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकलपीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सन्मान योजना जाहीर केली आहे.

या योजनेसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ७९ लाख २७ हजार शेतकरी पात्र आहेत.

पी एम किसान योजना

२०१९ साली मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू केली.या योजने अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला ६०००/- रुपये दिले जातात.

याच योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजनेसाठी चालू अर्थ संकल्पिय अधिवेशनात घोषणा केली या योजनेचा पहिला हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर २०००/- रुपये हप्ता जमा होणार आहे.Namo Shetkari Yojana

हे पण नक्की वाचा:- या यादीमध्ये नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये!

अशी आहे योजना

या योजनेअंतर्गत एका वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर ६०००/- रुपये जमा केले जातील.केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मिळून शेतकऱ्यांसाठी वर्षाकाठी १२०००/- रुपये मिळणार आहेत.

योजनेच्या अटी आणि शर्थी

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तसेच केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारच्या योजने साठी ज्या अटी आहेत त्याच अटी या योजनेसाठी लागू असणार आहेत.

या अटी खालील प्रमाणे

NAMO Shetkari Yojana
१.क्षेत्राची कुठलीही अट या साठी लागू नाही.

२.प्रधान मंत्री सन्मान योजनेचे सर्व ई केवायसी केलेले शेतकरी या साठी पात्र असतील.

३.आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी पात्र नसलेले शेतकरी

ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०१९ नंतर शेतजमीन खरेदी केली असेल असे शेतकरी सदर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.तसेच सरकारी कर्मचारी,करदाते इ.देखील या योजनेस पात्र नाहीत.

अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुप ला जॉइन व्हा.

Leave a comment