PM Kisan 15th Installment Date
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारतर्फे दिवाळीसाठी आनंदाची बातमी असणार आहे.मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
शेतकरी प्रतीक्षेत
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १४ हप्त्यांचे यशस्वीपणे वितरण करण्यात आले आहे.पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला होता. देशातील बरेच शेतकरी १५व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते.
ई-केवायासी बंधनकारक करण्यात आली होती
देशातील अनेक शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेत होते.तसेच जे मयत खातेदार आहेत त्यांच्या बँक खात्यावर देखील या योजनेचे पैसे वर्ग करण्यात येत होते.त्यामुळे शासनाच्या ही बाब लक्षात आल्यावर शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते.जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील हप्ता जमा होणार नसल्याचे शासनाने सांगितले होते.PM Kisan 15th Installment Date
या दिवशी मिळणार पीएम किसानचा १५वा हप्ता
PM Kisan 15th Installment Date
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार रुपयांचे १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी लाभार्थ्याला प्रती लाभार्थी २८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासनाकडून करण्यात आले आहे.पीएम किसान सन्मान निधीचा १५वा हप्ता १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मागील महिन्यात वितरित केला होता.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा दुहेरी फायदा होणार आहे.शेतकऱ्यांना वर्षाकाठी दोन्ही योजनांचे मिळून १२ हजार रुपये मिळणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.