PM Kisan FPO Yojana| पी एम किसान च्या लाभार्थ्यांना खुशखबर! केंद्र शासन देणार १८ लाख,त्वरित करा अर्ज

Spread the love

PM KISAN FPO YOJANA

PM Kisan FPO Yojana:- देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच राहणीमान उंचावे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘पी एम किसान एफपिओ’ PM Kisan FPO Yojana सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार १८ लाख रुपये आर्थिक मदत करते.परंतु सदर योजनेत (PM Kisan FPO Yojana) सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादक संघटना स्थापन कराव्या लागतील किंवा त्यामध्ये सहभागी व्हावे लागेल.या उत्पादक संघटनेमध्ये किमान ११ शेतकरी सदस्य असतील.

पी एम किसान एफपिओ च्या माध्यमातून खूप सारे फायदे मिळतात.एफपिओ शी संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास देश पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होते.

हे पण वाचा:- ग्राम पंचायत नुसार घरकुल यादी जाहीर,आजच डाऊनलोड करा!

तसेच त्यांना खते,बी बियाणे,यंत्रसामग्री व जीवनावश्यक वस्तू इत्यादी वस्तूंच्या खरेदी कमी दरात करू शकतात.तसेच शेतकऱ्यांना बँकेकडून सवलतीच्या दरात कर्जाचा लाभ घेता येतो.

पी एम किसान एफपीओ (PM Kisan FPO Yojana) साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजारच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.enam.gov.in) भेट द्यावी लागेल. येथे क्लिक करा

त्यानंतर आपण FPO चे पेज ओपन केल्यानंतर आपल्या समोर नोंदणी किंवा लॉगिन सह नवीन पेज ओपन होईल आपण तिथे योग्य ती माहिती भरून आपण सदर योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.

या शिवाय आपण आपल्या मोबाईल मध्ये ई-नाम ( e- NAM) हे ऍप डाउनलोड करून देखील जवळच्या ई-नाम मार्केटला भेट देऊन नोंदणी करू शकता.

शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा तसेच तो स्वावलंबी व्हावा यासाठी सरकारने २०२३-२४ पर्यंत १० हजार FPO तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा.तसेच ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत रहा.

Leave a comment