पीएम किसान नोंदणी साठी देशभर मोहीम,तुम्हाला पण पुन्हा नोंदणी करावी लागणार का? जाणून घ्या सविस्तर PM Kisan New Farmer Registration Saturation Campaign

Spread the love

PM Kisan New Farmer Registration Saturation Campaign
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी डीबीटी (डायरेक्ट बेनेफिशिअरी ट्रान्स्फर) योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केले जातात.सदरची योजना सुरू झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत करोडो शेतकरी पात्र करण्यात आले होते.

परंतु जसजसे लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाऊ लागला तसततसे लाभार्थ्यांची टक्केवारी कमी होऊ लागली.बोगस लाभार्थी,ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही,ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही असे शेतकरी,ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडींग चा डाटा आला नाही असे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वगळण्यात आले आहेत.

हे पण वाचा:- आता ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार तब्बल ५० लाख रुपये अनुदान!

देशातील या योजनेच्या साठी पात्र असलेले शेतकरी आणि सध्या लाभ घेत घेतलेले शेतकरी यांच्या संख्येत मोठी तफावत आहे.अजून देखील बरेच पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी पात्र असून देखील अद्याप पर्यंत नोंदणी केलेली नाही.तसेच लाखो शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांची अद्याप पर्यंत स्वीकारली गेली नाही.

45 दिवस देशभर मोहीम

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून १ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोहीम राबविली जात आहे.पीएम किसान सॅच्युरेशन कॅम्पैन (PM Kisan New Farmer Registration Saturation Campaign) असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील कृषी सचिव तसेच विविध अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सदरची मोहीम ही संपूर्ण देशभर ४५ दिवसांसाठी राबविली जाणार आहे.केंद्र सरकारच्या वतीने पात्र शेतकऱ्यांना आपली पीएम किसान योजनेच्या लाभासाठी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे करायची नोंदणी?

नवीन पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात (CSC Centre) जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.तसेच आपल्या जिल्ह्याच्या पीएम किसान नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून देखील आपण नोंदणी करू शकणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच नोंदणी साठी अर्ज केला आहे किंवा ज्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.अशा शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करण्याची गरज असणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment