PM Kusum Solar :- प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी निधी वितरित,पहा किती निधी मिळणार?

Spread the love

PM Kusum Solar
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ही एक महत्त्वाची योजना राबविली जाते.याच योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने एक महत्वाचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे राज्यातील पीएम कुसुम सोलर(PM Kusum Solar) पंप योजनेला गती मिळणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना येत्या ५ वर्षात ५ लाख सोलर पंप आस्थपणाचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.राज्यात सोलर पंप आस्थापणाचे काम सुरू आहे.राज्य सरकारने १३ जानेवारी २०२३ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता.त्यानुसार राज्यात १ लाख सोलर पंप वाटप करण्यास मंजुरी दिली होती.राज्यात एकूण ५ लाख सोलर पंपांपैकी १ लाख सोलर पंप वाटपाचे काम सुरू आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत २ लाख २५ हजार सोलर पंप आस्थापित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.यापैकी १ लाख ३ हजार ८०० सोलर पंपासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.त्यापैकी ६८,५७० सोलर पंप आस्थपित करण्यात आले आहेत.त्यापैकी ५८,२३० सोलर पंप सर्वसाधारण प्रवर्गासाठी तसेच उर्वरित १०,००० सोलर पंप अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

हे पण वाचा:- पाईप लाईन करण्यासाठी सरकार देतय अनुदान,ही संधी सोडू नका!

यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ३३९.९० कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच महाऊर्जाला वितरित करण्यात आला आहे.

भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) या अभियानाच्या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपाकरिता राज्य शासनाच्या १० टक्के हिस्स्या पोटी १५.६८ कोटी रुपये इतका निधी महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे सोलर पंप साठी पेमेंट झाले आहेत.वेंडर निवड झाली आहे.लाभार्थ्यांचा सेल्फ सर्व्हे आणि जॉइंट सर्व्हे झाले आहेत.परंतु बऱ्याच साऱ्या कंपन्यांकडून सोलर पंप इंस्टॉलेशन झालेले नाही.अशा परिस्थिती मध्ये कंपन्यांना देण्यासाठी ज्या आवश्यक निधीची तरतूद असते ती तरतूद आता राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलर पंप वाटप केले जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment