PM Suryoday Yojana :- केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांना विजेची कपात जाणवू नये यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.सरकारच्या वतीने पवन ऊर्जा,सौर ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांसाठी चालना दिली जात आहे.देशातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने पीएम कुसुम योजना सुरू केली होती.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात होते.
Table of Contents
शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी वाढते आकर्षण पाहून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री यांनी संपूर्ण देशात प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी असणार आहे.या योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या घरावर सौर पॅनल बसविले जाणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना सरकारच्या वतीने अनुदान दिले जाणार आहे.
काय आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या (PM Suryoday Yojana) अंतर्गत संपूर्ण देशभरात 1 कोटी नागरिकांच्या घरावर सौर पॅनल बसविले जाणार आहे.सर्वसामान्य कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.नागरिकांचा वीज बिलाचा खर्च कमी व्हावा आणि प्रत्येक घर विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.रहिवाशी क्षेत्रातील ग्राहकांनी आपल्या घरावर रुफ टॉप सौर पॅनल बसवावे यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
राज्यातील या 7 जिल्ह्यांमध्ये घरांवर बसविणार सोलर पॅनल
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला लाखो घरांवर रुफ टॉप सौर पॅनल बसविले जाणार आहेत.यामध्ये प्रामुख्याने पुणे,नाशिक,छत्रपती संभाजी नगर,लातूर,नांदेड,नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.या जिल्ह्यांमधील प्रत्येकी 25 हजार घरांवर रुफ टॉप सौर पॅनल बसविले जाणार आहेत.म्हणजेच राज्यात एकूण पावणे दोन लाख घरांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.31 मार्च 2024 पर्यंत हे सौर पॅनल बसविण्याचे उद्दिष्ट्य सरकारने ठेवले आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना अनुदान
PM Suryoday Yojana Subsidy
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या (PM Suryoday Yojana) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3kW क्षमतेचे पर्यंतचे सौर पॅनल बसविण्यासाठी प्रती kW 18000 रुपये अनुदान सरकार देणार आहे.तसेच 3kW ते 10kW क्षमतेचे सौर पॅनल बसविण्यासाठी सरकारच्या वतीने 3kW क्षमतेपर्यंत प्रती kW 18000 हजार रुपये अनुदान आणि 3kW च्या पुढे 10 kW पर्यंत प्रती kW 9000 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
अर्ज कुठे करायचा?
PM Suryoday Yojana Apply Online
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे.त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.