PMFBY Scheme 2023:- पीक विमा योजनेची व्याप्ती वाढणार!ट्रॅक्टर,तलाव आणि जनावरांचाही होणार समावेश!

Spread the love

PMFBY Scheme 2023

PMFBY Scheme 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना(Pradhan Mantri Fasal Bima Yojana) राबवित आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खरीप,रब्बी आणि फळपिकांना विमासंरक्षण दिले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते.

आत केंद्र सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याची तयारी करत आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या तलाव, ट्रॅक्टर तसेच जनावरांना देखील विमा संरक्षण दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढणार

केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असते.अशातच देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार लवकरच एक खास गिफ्ट देणार असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने दावा केला आहे.यामध्ये त्यांनी सांगितले आहे की,केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर,तलाव तसेच जनावरांचा देखील समावेश करणार आहे.

हे पण वाचा:- बंधन बँकेतून मिळवा ५०,००० रुपयांचे कर्ज,तेही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या

सदर योजना राबविण्यासाठी पीटीआयच्या मते देशात या योजनेच्या सर्वेक्षणासाठी AIDA PMFBY Scheme Crop Insurance या ॲपची मदत घेतली जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment