या योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणार ६००० रुपये,पहा तुम्हालाही मिळणार का?ऑनलाईन नोंदणी सुरू! PMMVY Scheme

Spread the love

PMMVY Scheme
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत आता गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी दोन टप्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे.तर १ एप्रिल २०२२ नंतर जन्मलेल्या दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी) सहा हजार रुपये एकावेळी दिले जाणार आहेत.पण बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यावर लस टोचालकानंतर ही रक्कम मिळणार आहे. तत्पूर्वी पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात ५ हजार रुपये दिले जात होते.

योजनेचे उदिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना मजुरी कमी मिळते.त्या नुकसानीची भरपाई मिळावी,जेणेकरून बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल या हेतूने योजनेत बदल करण्यात आला आहे.मात्र,वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिला व सध्या लागू असलेल्या कोणत्याही सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका,आरोग्य सेविका-सेवक, अधीपरीचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र- उपकेंद्रे,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,नागरी भागासाठी देखील अशीच यंत्रणा मदतीसाठी असणार आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ ते २२ डिसेंबर दरम्यान लाभार्थ्यांच्या नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.जिल्ह्यातील पहिल्या खेपेच्या (शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ५१० दिवसातील) म्हणजे जुलै २०२२ पासूनच्या गरोदर माता, तसेच १ एप्रिल २०२२ नंतर दुसरी मुलगी झालेल्या मातांची नोंदणी केली जात आहे.

तसेच लाभार्थी स्वतः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मोबाईल अप्लिकेशनद्वारे स्वत: ची नोंदणी करू शकतो.त्यासाठी केंद्र शासनाच्या https://pmmvy.wcd.gov.in वरील अर्ज भरावा लागणार आहे.नोंदणी व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल.

हे पण वाचा:- खास महिलांसाठी योजना,आता सॅनिटरी पॅड मिळणार फक्त १ रुपयात!

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

•मातेचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक
•मातेचे आधारसंलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचेपासबुक झेरॉक्स
•आरोग्य विभागाकडील नोंदणी कार्ड व बाळाचे लसीकरण नोंदणी कार्ड
•बाळाचा जन्मदाखला

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक पात्रता
PMMVY Scheme

•वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला

•अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना जातीचा दाखला

•४० टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग महिला

•बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला

•आयुष्यमान भागत अंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी

•ई श्रम कार्ड असलेल्या महिला

•किसान सन्मान निधीअंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी

•मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला

•गर्भवती,स्तनदा आशा कार्यकर्ती,अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment