Pradhanmantri Matru Vandana Yojana
Pradhanmantri Matru Vandana Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन योजना जाहीर केली आहे.सुरुवातीला 19 वर्ष वय असलेल्या गर्भवती महिलेला पहिले अपत्य झाल्यास सरकार मार्फत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत विविध तीन टप्प्यांमध्ये केली जात होती.
आता नव्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० अंतर्गत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत कायम ठेवत दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये सरकार देणार आहे.या संदर्भातील घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली आहे.(Pradhanmantri Matru Vandana Yojana)
Table of Contents
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची उद्दिष्ट्ये
Pradhanmantri Matru Vandana Yojana
कामगार महिलांची मजुरी कमी झाल्याबद्दल भरपाई म्हणून आर्थिक मदत सदर योजनेच्या माध्यमातून केली जाते. महिलांना योग्य विश्रांती मिळावी त्याचबरोबर योग्य पोषण मिळावे.गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या मातांचे आरोग्य सुधारावे.तसेच गरोदर स्त्रियांमधील अल्प पोषणाचा प्रभाव कमी व्हावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
हे पण नक्की वाचा:- या योजने अंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे फायदे Pradhanmatri Matru Vandana Yojana In Marathi
गर्भवती महिलांना पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मादरम्यान तसेच स्तनपान करणाऱ्या मातांना या योजनेचा लाभ होणार आहे.या योजनेच्या अंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबिटीद्वारे पाठविण्यात येणार आहे.सरकार लाभाची रक्कम विविध तीन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करते.
पहिला हप्ता :- गरोदरपणाच्या नोंदणीवेळी 1000 रुपये रक्कम जमा केली जाते.
दुसरा हप्ता :- गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास 2000 रुपये बँक खात्यात जमा केले जातात.
तिसरा हप्ता:- जेव्हा मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि मुलाला BCG,OPV,DTP आणि हेपेटाइटिस – बी चे पहिले लसीकरण सुरू केले जाते तेव्हा उर्वरित 2000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी लागू नाही
१.ज्या गर्भवती महिला किंवा स्तनदा माता केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रात नोकरी करत असतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार नाही.
२.तसेच इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळविणाऱ्या किंवा कायद्यांतर्गत समान लाभ मिळविणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
काय आहे?प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०
Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0
आता नव्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० अंतर्गत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत कायम ठेवत दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये सरकार देणार आहे.या संदर्भातील घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली आहे.(Pradhanmantri Matru Vandana Yojana Online Apply)
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० साठी नोंदणी कशी करायची?
Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 Registration
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० अंतर्गत दुसरे अपत्य मुलगी असेल तर गर्भवती महिला किंवा स्तनदा मातांना अधिकचे सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.त्याकरिता महिलांना अपत्य जन्मापासून 270 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ हा 1 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यानंतर दुसरे अपत्य म्हणून मुलगी झाल्यास करता येणार आहे.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.त्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० साठी आवश्यक पात्रता
१.लाभ घेणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक.
२.मनरेगा जॉब कार्ड धारण केलेल्या महिला
३.किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरी महिला
४.लेबर कार्ड धारण केलेल्या महिला
५.आयुष्मान भारत योजने अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य. योजना (PMJAY) अंतर्गत लाभार्थी महिला
६.गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका
७.अंगणवाडी व आशा सेविका
८.दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असलेल्या महिला
९.ज्या स्त्रिया अंशतः (४०%) किंवा पूर्णपणे अपंग आहेत
१०.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला
११.राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत शिधापत्रिका धारण करणाऱ्या महिला लाभार्थी
१२.तसेच लाभार्थ्यांकडे आधार कार्ड आणि लसीकरण कार्ड असणे आवश्यक आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.