तुमच्याकडे तुमचे प्रॉपर्टी कार्ड आहे का?त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही,असे काढा मोबाईलवरून घरबसल्या फक्त 5 मिनिटांत!Property Card Maharashtra

Spread the love

Property Card Maharashtra
महाराष्ट्र सरकारने डिजिटल स्वाक्षरीतले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.त्यासाठी तुम्हाला ते काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे डिजिटल स्वाक्षरीतले प्रॉपर्टी कार्ड फक्त ५ मिनिटांत काढू शकणार आहेत.

प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी कसे काढायचे?त्यासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे?याची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक.एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे त्याचा उल्लेख सात बारा उताऱ्यावर केला असतो तसेच एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याचा उल्लेख प्रॉपर्टी कार्डवर केलेला असतो.बिगर जमीन क्षेत्रात तुमच्या नावावर किती स्थावर मालमत्ता आहे याचा उल्लेख प्रॉपर्टी कार्डवर केला जातो.जसे की घर,बंगला,व्यवसायाची इमारत याचा उल्लेख प्रॉपर्टी कार्डवर मिळून येतो.

प्रॉपर्टी कार्ड साठी किती शुल्क आकारले जाते?

तुमची मालमत्ता ही महानगरपालिका क्षेत्रात येत असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी १३५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.तुमची मालमत्ता अ,ब,क नगरपालिका-नगरपंचायत क्षेत्रातील असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी कार्डसाठी ९० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच तुमची मालमत्ता ग्रामीण क्षेत्रात येत असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी कार्डसाठी ४५ रुपये इतके शुल्क मोजावे लागणार आहे.

हे पण वाचा:- आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळणार तुमच्या मोबाईलवरून,वेळेची आणि पैशांची होणार बचत!

प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं?
Property Card Maharashtra

•प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील इंटरनेट ब्राऊझर मध्ये bhulekh.mahabhumi.gov.in असे सर्च करायचे आहे.

•त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.

•तिथे उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.

•आता तुमच्यासमोर एक नवीन पेज होईल तिथे तुम्हाला लॉग इन करायचे आहे त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यांनतर Enter Mobile Number च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP या बटणावर क्लिक करायचे आहे.

•आता तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो OTP तुम्हाला Enter OTP या पर्यायाच्या खालच्या रकान्यात टाकून Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आता तुमच्यासमोर एक नवीन पेज होईल तिथे तुम्हाला Digitally Signed Property Card या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड हे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

•तिथे तुम्हाला तुमचा महसूल विभाग,जिल्हा,कार्यालय,गाव निवडायचे आहे. सी.टी.एस.नंबर या पर्यायासमोरच्या रकान्यात तुम्हाला तुमचा सिटी सर्व्हे नंबर टाकायचा आहे.

•पुढे Recharge Account या पर्यायावर क्लिक करायचे आहे.तुमच्यासमोर Make Online Payment नावाचे नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला वर नमूद केल्याप्रमाणे शुल्क रक्कम टाकायची आहे आणि Pay Now या पर्यायावर क्लिक करायचे आहे.पुढील पेज वरील Confirm या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•पुढे तुम्ही डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI च्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करू शकता.

•तुम्ही पेमेंट सक्सेस झाल्याचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर येईल तिथे तुम्हाला Continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आता तुम्हाला पुन्हा माहिती अपलोड करायची आहे.आणि Download या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आता तुमचे प्रॉपर्टी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल तिथून तुम्ही ते पाहू शकणार आहेत.

तर मंडळी अशा प्रकारे आपण आपले प्रॉपर्टी कार्ड आपल्या मोबाईल वरून डाउनलोड करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment