Punjabrao Dakh September Weather Update
गेल्या 3-4 वर्षांच्या पावसाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिलेले आहे.समुद्रामध्ये जुन महिन्यात तयार झालेल्या “बिपरजॉय” चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन उशिरा झाले.आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल परंतु राज्यातील अनेक धरणे अजून कोरडीच आहेत.
अशातच मान्सूनचा शेवटचा टप्पा आत्ता सुरू झाला आहे.राजस्थान मधून मान्सूनचा लवकरच परतीचा प्रवास सुरू होईल.आपल्या राज्यात 5 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरच्या आसपास परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हे पण वाचा:- बँकेमध्ये रक्कम जमा करण्यासाठी सरकारचा नवीन नियम लागू!
राज्यात मान्सून सक्रिय होऊन 3 महिन्यांचा काळ उलटला आहे.फक्त जुलै महिना वगळता जुन आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मान्सून बरसलाच नाही.यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मान्सूनच्या 122 वर्षांच्या इतिहासात जेवढा पावसाचा खंड पडला नव्हता तेवढा ऑगस्ट 2023 च्या ऑगस्ट महिन्यात पडला आहे.
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप पिके हातची निसटून चालली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचना सतावू लागली आहे.तसेच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न ऐरणीवर आहे.परतीचा मान्सून कोसळला नाही तर महाराष्ट्रात दुष्काळ अटळ आहे.त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न भीषण असणार आहे.
पंजाबराव डख हवामान अंदाज
अशातच महाराष्ट्रातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे.त्याची सुरुवात 02 सप्टेंबर पासून होणार असल्याचे सांगितले.02 ते 04 सप्टेंबर दरम्यान दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविली आहे.
त्याचप्रमाणे 05 सप्टेंबर पासून मराठवाड्यात आणि 06 सप्टेंबर पासून विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितला आहे.त्यांच्या अंदाजानुसार 05 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विविध भागामध्ये पाऊस बरसणार आहे.
राज्याच्या हवामान विभागाने देखील राज्यात 04 सप्टेंबर नंतर पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे.त्यामुळे पंजाबराव डख आणि हवामान विभाग यांच्यातील कोणाचा अंदाज खरा ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.