पंजाबराव डख हवामान अंदाज:- महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान अंदाज अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज वेळोवेळी खरा ठरत आलेला आहे.त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागून असते.मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.कुठे कुठे तर अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील काही दिवसांसाठी राज्यातील हवामान कसे राहील तसेच अवकाळी पावसाची हजेरी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये राहील याचा सविस्तर हवामान अंदाज त्यांनी सांगितला आहे.चला तर मग जाणून घेऊया हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज.
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 1 मार्च आणि 2 मार्च रोजी पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच उर्वरित भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे.त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन उकाडा जाणवणार आहे.तसेच त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस देखील पडणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये पडणार अवकाळी पाऊस
पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार धुळे, नंदुरबार,जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि यावल,कन्नड तालुका,बुलढाणा जिल्हा,अकोला जिल्हा,अमरावती जिल्हा या ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे.तसेच काही ठिकाणी हा पाऊस नुकसानीचा ठरणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात,कोकण किनारपट्टी या भागांमध्ये 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे.या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.परंतु हा पाऊस नुकसानीचा असणार नाही ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी.
मराठवाडा विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी सांगितली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त घाबरून जाण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.तसेच वाऱ्याची दिशा बदलली की हवामानामध्ये बदल होऊ शकतो असे देखील पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.