Rain Forecast:- आज या ठिकाणी मेघराजा विजांच्या कडकडाटासह बरसणार, पहा तुमच्या भागात कोसळणार का?

Spread the love

Rain Forecast

Rain Forecast
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात ऑक्टोबर हिटमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.मेघराजा जर पडला नाही तर संपूर्ण रब्बी पिकाचा हंगाम वाया जाणार आहे.

आज २२ ऑक्टोबर साठी हवामान विभागाने राज्यातील कोकण विभागातील ठाणे,रत्नागिरी,रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.तसेच उर्वरित महाराष्ट्रात हवामान ढगाळ असणार आहे.

मान्सूनने देशातून काढता पाय घेतला आहे.त्यामुळे पावसाची शक्यता कमीच असल्याचे जाणकार सांगत आहेत.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे वाहू लागले आहे.त्यामुळे आपल्या राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला तीन हजार रुपये

आपल्या राज्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस काही ठराविक भागातच पडतो.राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.21 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद डहाणू मध्ये झाली. त्या पाठोपाठ सोलापूर येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यातील इतर शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान पुणे ३२.३,जळगाव ३५.४,सातारा ३१.६,सांगली ३३.०, नाशिक ३३.४,महाबळेश्वर २५.६,कोल्हापूर ३३.५,जळगाव ३५.४,बुलढाणा ३३.५,अकोला ३५.७,परभणी ३४.४,नांदेड ३४.२,छत्रपती संभाजीनगर ३२.५,अमरावती ३२.२,चंद्रपूर ३२.८,गडचिरोली ३३.०,यवतमाळ ३३.०, नागपूर ३२.६ अंश सेल्सिअस.

राज्यात पाऊस जर पडला नाही तर रब्बीची संपूर्ण पिके धोक्यात असणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता सतावू लागली आहे.राज्य सरकारने 43 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे पाऊस पडला तर ही परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.तसेच वाढलेले तापमान कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment