Ready Reckoner Rate
महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोंदणी मुद्रांक आणि शुल्क विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनींचे ‘रेडीरेकनर’ दर कळावे यासाठी नवीन जिओ पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही शहराच्या अथवा गावाच्या नकाशावर क्लिक केल्यास त्या भागातील सरकारी,खाजगी जमिनींचे’रेडीरेकनर'(Ready Reckoner Rate) भाव सहज कळणार आहेत.
या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत पुण्यासह राज्यातील इतर २२ जिल्हे,४० महानगरपालिका आणि नगर परिषद भागातील ‘रेडीरेकनर’ दर अपलोड करण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जानेवारी महिन्यापासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.या सुविधेमुळे राज्यातील नागरिकांना घरबसल्या आपल्या जमिनीचा रेडीरेकनर दर माहित करून घेता येणार आहे.
कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जमिनीचा ‘रेडीरेकनर’ दर जाणून घेण्यासाठी मुद्रांक शुल्क कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागतो.त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा उतारा द्यावा लागतो.तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.काही ठिकाणी अधिकारी वर्गाला चिरीमिरी देखील द्यावी लागते.परंतु आता नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या ‘रेडीरेकनर’ दर पाहता येणार आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टींना चाप बसणार आहे.
जिओ पोर्टल वरून कळणार ‘रेडीरेकनर’ दर
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर ‘रेडीरेकनर’ दर कळावेत यासाठी जिओ पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून यासाठी काम सुरू आहे. राज्यातील ग्रामीण,शहरी तसेच प्रभाव क्षेत्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.राज्यातील काही भागांचा ‘रेडीरेकनर’ दर या पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. तर उर्वरित भागांचे काम प्रगती पथावर सुरू आहे.
२२ जिल्ह्यांचे ‘रेडीरेकनर’ दर अपलोड
माहिती जमा करून अपलोड करण्यासाठी ‘एमआरसॅक’ ची मदत घेण्यात येत आहे.आतापर्यंत २२ महानगर पालिका असलेल्या शहरांचे ‘रेडीरेकनर’ दर अपलोड करण्यात आले आहेत.तर उर्वरित १३ जिल्ह्यांचे ‘रेडीरेकनर’ दर लवकरच अपलोड केले जाणार आहेत.
‘रेडीरेकनर’ म्हणजे काय?
‘रेडीरेकनर’ म्हणजे सरकारच्या दृष्टीने एखाद्या जागेची निश्चित केलेली किंमत म्हणजे ‘रेडीरेकनर’ होय.प्रत्येक शहर आणि गावांसाठी हा ‘रेडीरेकनर’ दर वेगवेगळा असू शकतो. ‘रेडीरेकनर’ दर निश्चित करण्याचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारला आहेत.नगररचना विभाग आणि नोंदणी मुद्रांक विभाग संयुक्तपणे ‘रेडीरेकनर’ दर निश्चित करतात.
नकाशांचे काम पूर्ण झालेले जिल्हे
नगर,पुणे,सोलापूर,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर, नाशिक,धुळे,नंदुरबार ,जळगाव,जालना,बीड ,नांदेड,परभणी,धाराशिव,लातूर,हिंगोली,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,वाशिम,अमरावती आणि सिंधुदुर्ग.
एमएसआरके कडे उपलब्ध नकाशाच्या आधारावर ‘रेडीरेकनर’ अपलोड करण्यात आले आहेत.त्यामध्ये निवासी क्षेत्र,वन विभाग,पुणे महानगर प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) धर्तीवरील नियोजन प्राधिकरणाचे नकाशेही यात समाविष्ट करण्यात आले आहेत.त्यामुळे ‘रेडीरेकनर’ कळणे शक्य होणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.