Saving Account
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल कोणत्याही बँकेत बचत खाते असणे सामान्य बाब आहे.जर कोणी नोकरीला असेल तर अशा व्यक्तींच्या पगारासाठी बँकेत खाते उघडावे लागते ते खाते देखील बचत खात्या(Saving Account) सारखेच असते.
बचत खाते धारक व्यक्तींना बँकेकडून काही प्रमाणात व्याज देखील दिले जाते.जर आपल्याकडे बचत बँक खाते असेल तर त्या खात्यामध्ये बँकेने ठरवलेली कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवावी लागते.
बँकेत खात्यामध्ये कमीत कमी ठेवावी लागणारी रक्कम ही वेगवेगळी असू शकते.काही बँका १ हजार रुपये तर काही बँका २० हजार रुपयांपर्यंत कमीत कमी रक्कम ठेवण्यास सांगतात.तुम्ही ज्या भागात राहतात त्यावर ही रक्कम अवलंबून असते.
जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर कमी रक्कम खात्यावर ठेवावी लागते.तसेच शहरी भागातील खातेदारांना जास्त रक्कम ठेवावी लागते.
काही खातेदारांना आपल्या बँक खात्यात कमीत कमी रक्कम ठेवणे देखील मुश्किल असते.तसेच बऱ्याच वेळा काही खातेदार आपल्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवू शकत नाहीत.
हे पण वाचा:- तुमचे आधार कार्ड सुद्धा १० वर्षे जुने असेल तर हे काम नक्की करा,UIDAI ने दिला इशारा!
अशा परिस्थितीमध्ये बँकेकडून दंड वसूल केला जातो.तुमचे बचत खाते जरी सुरक्षित असले तरी देखील तुम्हाला कमीत कमी रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागणार आहे.नसता तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
किती दंड भरावा लागतो?
देशातील प्रत्येक बँकेची दंड वसुलीसाठीची रक्कम वेग वेगळी आहे.बँकांच्या माध्यमातून बचत खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास २,००० रुपये ते १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.बँकांकडून आकारला जाणारा दंड ही ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
जिथे ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवता येत नाही तिथे त्यांना अतिरिक्त पेमेंट करण्यास सांगितले जाते. जर तुम्ही या समस्येशी झगडत असाल तर तुम्ही या समस्येपासून एक प्रकारे सुटका मिळवू शकता.
यासाठी काय करावे लागेल?
सर्व प्रथम तर तुम्हाला तुमचे बँक खाते बंद करावे लागेल. परंतु खाते बंद करताना तुमच्या खात्यात नीगेटीव्ह शिल्लक रक्कम असता कामा नये.यानंतर तुम्हाला एक नवीन झिरो बॅलन्स खाते उघडायचे आहे.झिरो बॅलन्स खाते म्हणजे ती खाती ज्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवावी लागत नाही.
जर तुम्ही तुमचे पहिले खाते असलेल्या बँकेत झिरो बॅलन्स खाते उघडू शकत नसाल तर दुसऱ्या बँकेत जाऊन तुम्ही उघडू शकता.परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की या खात्यांमध्ये व्यवहार शुल्क जास्त असू शकते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.