Aadhaar Card :- तुमचे आधार कार्ड सुद्धा 10 वर्षे जुने असेल तर हे काम नक्की करा, UIDAI ने दिला इशारा!

Spread the love

Aadhaar Card
नमस्कार मित्रांनो आमच्या आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आधार कार्ड हे भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र पुराव्याचे दस्तऐवज आहे.आधार कार्ड हे कोणत्याही शासकीय किंवा खाजगी कामासाठी लागणारे प्रमाणपत्र आहे.देशातील जवळपास सर्वच नागरिकांकडे १२ अंकी नंबर असलेले आधार कार्ड आहे.

आधार कार्ड हे व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती,नाव, पत्ता आणि लिंग ओळख अशी माहिती देते.देशात ओळखीचा पुरावा म्हणून देखील आधार कार्ड वापरले जाते.ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून १० वर्षे झाली असतील अशा नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करावे अशी सूचना Unique Identification Authority Of India अर्थात UIDAI ने दिल्या आहेत.

UIDAI ने नागरिकांना आपले आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी १४ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती.परंतु आता याच मुदतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे सांगितले आहे. UIDAI ने नव्याने दिलेल्या माहितीनुसार आता १४ मार्च २०२४ पर्यंत देशातील नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट करण्याची संधी देण्यात आली आहे.या निर्णयामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

तुमचे आधार कार्ड जर १० वर्षे जुने असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.परंतु UIDAI ने असे करण्यासाठी कोणतीही सक्ती केलेली नाही.जर तुमचा पत्ता बदलला गेला असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

आधार कार्डची गरज काय?

आधार कार्ड हे ओळखपत्र असेल तरीही अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देशभरात वापरले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण देशातील जवळपास ११०० सरकारी योजनांसाठी आधार कार्ड वापरले जाते.त्यापैकी ३१९ योजना केंद्र सरकारच्या आहेत.याचबरोबर अनेक बँका तसेच वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांच्या खात्रीसाठी देखील आधार कार्ड विचारतात.

हे पण वाचा:- तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? नसेल तर होईल मोठे नुकसान!

अशा प्रकारे आधार कार्ड अपडेट करा

UIDAI ने सांगितले आहे की,आधार कार्ड असलेल्या व्यक्ती आपले आधार कार्ड आपल्याच मोबाईलवरून myaadhaar या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अपडेट करू शकणार आहेत.त्यासाठी त्यांना आपल्या पत्याचा पुरावा आणि ओळख प्रमाणपत्राची कॉपी अपलोड करावी लागणार आहे.ज्या नागरिकांना हे शक्य नाही ते नागरिक आधार कार्ड सेंटर वरती जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करू शकता.त्यासाठी त्यांना आपल्या ओळखपत्राची स्वयं-साक्षांकित प्रत द्यावी लागणार आहे.

आधार कार्ड मोफत ऑनलाईन अपडेट करा

१.UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

२.Update Here हा पर्याय निवडा.

३.तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका.

४.तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाका.

५.नंतर Document Update या पर्यायावर क्लिक करा.इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती मिळेल.

६.इथे तुम्हाला सगळी माहिती योग्य आहे याची खात्री करायची आहे आणि पुढील Hyperlink वरती क्लिक करायचे आहे.

७.पुढे तुम्हाला ड्रॉपडाऊन सुचीमधून ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची कागदपत्रे निवडायची आहेत.

८.यानंतर तुम्हाला पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करून Submit बटणावर क्लिक करायचे आहे.

९.वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची विनंती स्वीकारली जाईल.आणि एक १४ अंकी ॲप्लिकेशन नंबर तयार होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment