Sheli Gat Vatap Yojana:- 10 शेळ्या 1 बोकड गट वाटप योजना सुरू,मिळणार 75 टक्के अनुदान,असा करा ऑनलाईन अर्ज!

Spread the love

Sheli Gat Vatap Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना १० शेळ्या आणि १ बोकड गट तसेच १० मेंढ्या आणि १ नर मेंढा गट वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.सदर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक तसेच पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून केले आहे.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून शेळी/मेंढी गट वाटप योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे,आवश्यक पात्रता,अनुदानाची रक्कम इत्यादींची माहिती जाणून घेणार आहेत.त्यासाठी आपल्याला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया शेळी/मेंढी गट वाटप योजनेबद्दल.

काय आहे योजना?
Sheli Vatap Yojana

महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना १० शेळ्या व १ बोकड आणि १० मेंढ्या व १ नर मेंढा वाटप करण्यात येणार आहे.त्यासाठी राज्य सरकार पात्र लाभार्थ्यांना ५० ते ७५ टक्के अनुदान वितरित करणार आहे.सदरची योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार नाही.

कोणत्या जातीच्या शेळ्यांचे वाटप होणार?
Sheli Gat Vatap Yojana

पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळया व बोकड यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत.तसेच कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळया व बोकड यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत.

कोणाला मिळणार लाभ?
Sheli Mendhi Gat Vatap Yojana

१.दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२.अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
३.अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
४.सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
५.महिला बचत गटातील सदस्य

शेळी गट प्रकल्प किंमत

Sheli Gat Vatap Yojana

पशु संवर्धन विभागाच्या अंतर्गत उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या पैदासक्षम शेळ्यांची किंमत प्रती शेळी ८ हजार रुपये प्रमाणे १० शेळ्यांची ८० हजार रुपये आणि एक उस्मानाबादी/संगमनेरी नर बोकडाची किंमत १० हजार रुपये ग्राह्य धरण्यात येते.तसेच अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम शेळ्यांची प्रती शेळी ६ हजार रुपये प्रमाणे १० शेळ्यांसाठी ६० हजार आणि स्थानिक पैदासक्षम १ नर बोकडाची किंमत ८ हजार रुपये ग्राह्य धरण्यात येते.त्याचबरोबर तीन वर्षांसाठी शेळ्यांचा विमा आणि वस्तू व सेवा कर म्हणून उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी १३,५४५ रुपये आणि अन्य स्थानिक जातींसाठी १०,२३१ रुपये खर्च ग्राह्य धरण्यात येतो.उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी एकूण १,०३,५४५ रुपये आणि अन्य स्थानिक जातींसाठी ७८,२३१ रुपये प्रकल्प खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे.याच खर्चाच्या ५० ते ७५ टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

हे पण वाचा:- पाईप लाईन करण्यासाठी सरकार देतय अनुदान,ही संधी सोडू नका!

मेंढी गट प्रकल्प किंमत
Sheli Gat Vatap Yojana

Sheli Gat Vatap Yojana

पशु संवर्धन विभागाच्या अंतर्गत माडग्याळ जातीच्या पैदासक्षम मेंढ्यांची किंमत प्रती मेंढी ८ हजार रुपये प्रमाणे १० मेंढ्यांची १ लाख रुपये आणि एक माडग्याळ नर मेंढ्यांची किंमत १२ हजार रुपये ग्राह्य धरण्यात येते.तसेच दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम मेंढ्यांची प्रती मेंढी ८ हजार रुपये प्रमाणे १० मेंढ्यांसाठी ८० हजार आणि स्थानिक पैदासक्षम १ नर मेंढ्याची किंमत १० हजार रुपये ग्राह्य धरण्यात येते.त्याचबरोबर तीन वर्षांसाठी मेंढ्याचा विमा आणि वस्तू व सेवा कर म्हणून माडग्याळ जातीसाठी १६,८५० रुपये आणि दख्खनी व अन्य स्थानिक जातींसाठी १३,५४५ रुपये खर्च ग्राह्य धरण्यात येतो. माडग्याळ जातीसाठी एकूण १,२८,८५० रुपये आणि अन्य दख्खनी व स्थानिक जातींसाठी १,०३,५४५ रुपये प्रकल्प खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे.याच खर्चाच्या ५० ते ७५ टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

शेळी गटासाठी अनुदानाची एकूण किती रक्कम मिळते?

Sheli Gat Vatap Yojana

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी शेळी गट साठी ७५ टक्के अनुदान वितरित करण्यात येते.यामध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी शेळी गट साठी एकूण ७७,६५९ रुपये आणि अन्य स्थानिक जातीच्या शेळी गटासाठी ५८,६७३ रुपये अनुदान वितरित केले जाते.सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी शेळी गट साठी ५० टक्के अनुदान वितरित करण्यात येते.यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना
उस्मानाबादी/संगमनेरी शेळी गट साठी एकूण ५१,७७३ रुपये आणि अन्य स्थानिक जातीच्या शेळी गट खरेदीसाठी ३९,११६ रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

मेंढी गटासाठी एकूण किती अनुदान मिळते?
शेळी,मेंढी गट वाटप योजना

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना माडग्याळ जातीच्या मेंढी गट वाटप साठी एकूण ९६,६३८ रुपये आणि दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढी गट वाटप साठी एकूण ७७,६५९ रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना माडग्याळ जातीच्या मेंढी गट वाटप साठी एकूण ६४,४२५ रुपये आणि दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढी गट वाटप साठी एकूण ५१,७७३ रुपये अनुदान शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

Sheli Gat Vatap Yojana

१.फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२.सातबारा उतारा
३.८ अ उतारा
४.अपत्य दाखला/स्वघोषणा पत्र
५.आधार कार्ड
६.रहिवाशी प्रमाणपत्र
७.बँक खाते पासबुक
८.रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते.)
९.७/१२ उतारा नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र/अथवा जमीन भाडे करारनामा
१०.अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
११.दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
१२.दिव्यांग असल्यास दाखला
१३.बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४.वय-जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५.शैक्षणिक पात्रतेचा दाखला
१६.रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत
१७.प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अर्ज कुठे करायचा?
Sheli Palan Yojana

पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यात १० शेळया/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा योजनेसाठी इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे.त्यासाठी पशु संवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर अर्ज भरावा लागणार आहे.अर्ज भरण्यापूर्वी अर्जदार नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.त्यासाठी आम्ही खाली लिंक दिलेली आहे.तिथे क्लिक करून तुम्ही अर्ज नोंदणी आणि अर्ज भरू शकणार आहेत.अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही १५ डिसेंबर २०२३ असणार आहे.मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

अर्जदार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

शेळी मेंढी गट वाटप योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment