Sheti Tar Kumpan Yojana 2023
Sheti Tar Kumpan Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण राज्य सरकारच्या एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच विविध योजना राबवत असते.शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशीच एक योजना राज्य सरकार मार्फत राबविली जात आहे.
आपल्या शेतात पीक चांगले यावे त्याचबरोबर चांगले उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतो. कधी कधी नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे नुकसान होते. त्याचबरोबर शेती पिकांचे वन्य प्राणी किंवा पाळीव प्राणी यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करावे लागते.त्यासाठी शेताला तार कुंपण करण्याची गरज शेतकऱ्याला भासते.परंतु तार कुंपणाचा खर्च अधिक असल्याने शेतकरी टाळाटाळ करतात.हीच बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने सरकारने शेतकऱ्यांना तार कुंपण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली.
वायर फेन्सिंग सब्सिडी नावाची योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली.या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला तार कुंपण करण्यासाठी 90% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
योजने बद्दल थोडक्यात माहिती
Sheti Tar Kumpan Yojana
महाराष्ट्र राज्य शासनाच्या डॉ.शामा प्रसाद मुखर्जी वन विकास व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंतर्गत शेतीला तार कुंपण करण्यासाठी 90% अनुदान दिले जाते.उर्वरित 10% खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.
त्यामुळे शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान कमी होणार आहे.हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ क्विंटल वजनाचे 30 खांब आणि तार देण्यात येते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.तसेच शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष देखील कमी करता येणार आहे.त्यामुळे मनुष्य आणि वन्य प्राणी यांच्या जीवाचे संरक्षण होणार आहे.
हे पण वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22500/- रुपये नुकसान भरपाई
अर्ज कुठे करायचा?
Sheti Tar Kumpan Yojana
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला आपल्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
सदर योजनेचा अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयात मिळणार आहे.
तो अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या कृषी विभाग अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा
शेतीचा मार्ग
8अ उतारा
जात प्रमाणपत्र
वरील कागदपत्रे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.