स्कायमेटचा हवामान अंदाज,अवकाळी पावसाचे संकट अजून टळले नाही,राज्यासह देशातील ‘या’ 31 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता!

Spread the love

Havaman Andaj: मागील वर्षापासून राज्यातील शेतकरी विविध प्रकारच्या अस्मानी संकटांशी सामना करत आहे.अवकाळी पाऊस,गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी अशा संकटांनी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढविली आहे.त्यामुळे शेती व्यवसाय आणखीनच आव्हानात्मक बनत चालला आहे.

देशावर त्याचबरोबर राज्यावर विविध प्रकरचे अस्मानी संकट तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे उत्पादन घटले आहे.याचाच परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर देखील होत आहे.मागील वर्षाच्या सरतेशेवटी राज्यावर अवकाळी पावसाचे नैसर्गिक संकट पाहायला मिळाले आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर पाहायला मिळाले.त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर थंडीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले.

राज्यात रब्बीची पिके चांगली जोमात असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावली.यामुळे खरीप हंगामातील तूर तसेच कापूस आणि रब्बी हंगामातील कांदा यांसारख्या पिकांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले.

अस्मानी तसेच नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीत.अशातच स्कायमेट या खाजगी संस्थेने नवीन हवामान अंदाज सांगितला आहे.यानुसार राज्याचे अवकाळी पावसाचे संकट टळले नसल्याचे सांगितले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तसेच देशभरातील ३१ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी संस्थेने सांगितला आहे.

या अंदाजानुसार राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.त्याचबरोबर राज्यातील तापमानामध्ये घट देखील होणार असल्याचा अंदाज आहे.त्यामुळे राज्यातील थंडीचे प्रमाण वाढणार आहे.

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह,अरुणाचल प्रदेश,मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे.मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर,नीमच, अलिजापुर, बरवानी,बुऱ्हाणपूर, धार,इंदोर, झाबुआ,खंडवा तसेच खरगोन या १० जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.तसेच मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होणार असल्याचा अंदाज आहे.

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसर राज्यात आज आणि उद्या अवकाळी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा:- अवकाळी पाऊस अजून किती दिवस?आणि कुठे बरसणार?जाणून घ्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज!

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment